संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 29 : तालुक्यातील पडवे येथील निर्मल ग्रामपंचायतची तहकूब 15 ऑगस्टची ग्रामसभा सरपंच मुजीब जांभारकर यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीला इतिवृत्त आणि जमा खर्चाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर ग्रामसेविका सौ. पाटील यांनी ग्रामपंचायत मधील विविध विकासकामांचा आढावा घेतला. ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांवर आणि विकासकामांविषयी सरपंच जांभारकर यांनी सविस्तर उत्तरे देऊन मार्गदर्शन केले. त्यानंतर अजेंड्यानुसार नवीन तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून श्री. विलास गडदे यांची एकमुखाने निवड करण्यात आली. Padve Tantamukti President Vilas Gadade
श्री. विलास गडदे हे परिसरात सर्वांच्या अडी-अडचणीला तत्परतेने धावून जाणारे तसेच सर्वांशी सलोख्याचे संबंध जपणारे म्हणून परिचित आहेत. त्यांच्या निवडीचे सरपंच मुजीब जांभारकर आणि ग्रामस्थांनी स्वागत करत त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. Padve Tantamukti President Vilas Gadade

यावेळी तरुण उत्कर्ष मंडळ पडवेच्या वतीने ग्रामसभेमध्ये गणेशोत्सवात ग्रामस्थ आणि महिला यांना त्रास होऊ नये म्हणून गावात सौर उर्जा दिप गावामधे बसवण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली. यावेळी सरपंच मुजीब जांभारकर यांनी तात्काळ मंजुरी देऊन तशी उपलब्धता करून दिली. त्यांच्या या निर्णयाचे ग्रामस्थांकडून स्वागत केले. Padve Tantamukti President Vilas Gadade

या सभेला ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र खातू, शमा मखजनकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गडदे, पोलिस पाटील अनंत गांधी, सुमेध सुर्वे, अमानत जांभारकर, विनायक भोसले, पराग कोळवणकर, सचिव नईम मखजनकर, ओंकार गडदे यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. Padve Tantamukti President Vilas Gadade