• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 December 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पंतप्रधानांनी ‘कर्तव्य पथ’ चे केले उद्‌घाटन

by Mayuresh Patnakar
September 9, 2022
in Bharat
16 0
0
P.M. Modi inaugurated the 'Kartavya Path'
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

इंडिया गेट येथे नेताजींच्या पुतळ्याचे अनावरण

दिल्ली, ता. 09 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘कर्तव्य पथ’ चे उद्‌घाटन केले. शक्तीचे  प्रतीक म्हणून ओळखला जाणारा राजपथ आता लोकांचे स्वामित्व आणि सक्षमीकरणाचे उदाहरण म्हणून कर्तव्यपथ होणे हे बदलाचे प्रतीक आहे. पंतप्रधानांनी यावेळी इंडिया गेट येथील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरणही केले. P.M. Modi inaugurated the ‘Kartavya Path’

‘कर्तव्य पथ’ चे उद्‌घाटन

गेल्या अनेक वर्षांमध्ये राजपथ आणि सेन्ट्रल विस्टा अव्हेन्यू परिसराला भेट देणाऱ्यांच्या वाढत्या रहदारीमुळे इथल्या पायाभूत सुविधांवर ताण पडत होता. या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, रस्त्याकडेच्या  सोयुसुविधा  आणि पार्किंगसाठी पुरेशी जागा या मूलभूत सुविधांची उणीव होती. तसेच या ठिकाणी  अपुरी चिन्हे, कारंजी आणि इतर जलाशय यांची    निकृष्ट दर्जाची देखरेख आणि अव्यवस्थित पार्किंग होते. त्याबरोबरच सार्वजनिक हालचालींवर कमीत कमी निर्बंध आणून कमी व्यत्ययासह प्रजासत्ताक दिनाची परेड आणि अन्य राष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन करण्याची गरज भासू लागली. या गोष्टी लक्षात घेऊन पुनर्विकास करण्यात आला.

Prime Minister inaugurated the 'Duty Path'

नवीन कर्तव्य पथ हा सुशोभित लँडस्केप, पायवाटांसह हिरवळ, अतिरिक्त हिरवळीची जागा, नूतनीकरण केलेले कालवे, नवीन सुविधा ब्लॉक्स, सुधारित चिन्हे आणि वेंडिंग किऑस्क अशा बाबींनी सज्ज आहे . याशिवाय, नवीन पादचारी अंडरपास, सुधारित पार्किंगच्या  जागा, नवीन प्रदर्शन फलक आणि रात्रीची सुधारित प्रकाश व्यवस्था ही काही इतर वैशिष्ट्ये आहेत जी नागरिकांना चांगला अनुभव देतील. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन, पुराच्या पाण्याचे व्यवस्थापन, वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर, पावसाच्या पाण्याची साठवण, जलसंवर्धन आणि ऊर्जा-कार्यक्षम प्रकाश व्यवस्था यासारख्या अनेक शाश्वततेच्या (टिकाऊ) वैशिष्ट्यांचा देखील समावेश आहे. P.M. Modi inaugurated the ‘Kartavya Path’

Prime Minister inaugurated the 'Duty Path'

नेताजींच्या पुतळ्याचे अनावरण

पंतप्रधानांनी यंदाच्या वर्षी जानेवारी 23 रोजी पराक्रम दिनी ज्या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण केले होते, त्याच जागी पंतप्रधानांनी आज अनावरण केलेला नेताजींचा पुतळा स्थापन करण्यात आला आहे. ग्रॅनाईटचा हा पुतळा आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील नेताजींच्या अतुलनीय योगदानाला समर्पक अशी आदरांजली आहे आणि ते देशावरच्या त्यांच्या ऋणांचे प्रतीक असेल. प्रमुख शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेला, 28 फूट उंचीचा हा पुतळा मोनोलिथिक ग्रॅनाइट दगडातून कोरला गेला आहे आणि त्याचे वजन 65 मेट्रिक टन इतके आहे. P.M. Modi inaugurated the ‘Kartavya Path’

P.M. Modi inaugurated the 'Kartavya Path'
पंतप्रधानांनी श्रमिक आणि मजुरांचे देखील आभार मानले, त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या संचलन सोहळयासाठी निमंत्रण दिले.

पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले की.  स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवाच्या काळात आज देशाला एक नवी प्रेरणा आणि ऊर्जा जाणवत आहे. आज आपण भूतकाळ मागे टाकून नवे रंग भविष्याच्या चित्रात भरत आहोत. आज ही  नवा आभा सर्वत्र दिसत आहे, ती  नवभारताच्या  आत्मविश्वासाची आभा  आहे. “किंग्सवे म्हणजेच गुलामगिरीचे प्रतीक असलेला राजपथ आजपासून इतिहासाचा भाग झाला  आहे. आणि त्याचे अस्तित्व कायमचे  पुसले  गेले  आहे. आज ‘कर्तव्यपथ’च्या रूपाने नवा इतिहास रचला गेला  आहे. स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात गुलामगिरीच्या आणखी एका ओळखीतून मुक्त झाल्याबद्दल मी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. P.M. Modi inaugurated the ‘Kartavya Path’

Prime Minister inaugurated the 'Duty Path'

इंडिया गेटजवळ आपले राष्ट्रनायक  नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य  पुतळा  स्थापित करण्यात आला आहे. गुलामगिरीच्या काळात येते  ब्रिटीश राजवटीच्या प्रतिनिधीचा पुतळा होता. आज त्याच ठिकाणी नेताजींच्या पुतळ्याची स्थापना करून देशाने आधुनिक, सशक्त भारताची प्राणप्रतिष्ठा  केली  आहे. नेताजींच्या महानतेचे स्मरण करून पंतप्रधान म्हणाले, “सुभाषचंद्र बोस हे एक महान व्यक्ती होते, संपूर्ण जग त्यांना नेता मानत होते. त्यांच्यात धैर्य आणि स्वाभिमान होता. त्यांच्याकडे विचारधन होते, त्यांच्याकडे दूरदर्शित्व  होते. त्याच्याकडे नेतृत्व क्षमता आणि धोरणे होती. ताचा गौरवशाली इतिहास प्रत्येक भारतीयाच्या रक्तात आणि परंपरेत आहे. नेताजींना  भारताच्या वारशाचा अभिमान होताच. त्याचसोबत त्यांना भारताला आधुनिक करायचे होते. स्वातंत्र्यानंतर भारताने सुभाषबाबूंचा मार्ग अवलंबला असता तर आज देश वेगळ्या  उंचीवर असता. पण दुर्दैवाने आपल्या या महान नायकाचे  स्वातंत्र्यानंतर विस्मरण झाले. त्यांच्या कल्पना, त्यांच्याशी निगडित प्रतीकांकडेही दुर्लक्ष करण्यात आले,” अशी खंत पंतप्रधानांनी व्यक्त केली. P.M. Modi inaugurated the ‘Kartavya Path’

केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्री हरदीप सिंग पुरी, केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी, भारताचे केंद्रीय सांस्कृतिक राज्य मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि मिनाक्षी लेखी आणि केंद्रीय गृह निर्माण आणि नगर विकास राज्य मंत्री कौशल किशोर या कार्यक्रमाला उपस्थित होते. P.M. Modi inaugurated the ‘Kartavya Path’

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarP.M. Modi inaugurated the 'Kartavya Path'टॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.