रत्नागिरी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी
रत्नागिरी, ता.11: एनसीसीतर्फे आयोजित ओव्हरसिज डिप्लॉयमेंट या पाच देशांत झालेल्या विशेष कॅंपमध्ये गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या (Gogte-Joglekar College) सौरभ संजय लघाटे या एनसीसी छात्राला संधी मिळाली. या कॅंपचा कालावधी १२ एप्रिल ते १८ मे हा घेण्यात आला होता. नुकताच सौरभ रत्नागिरीत दाखल झाला आहे. याबद्दल त्याचे रत्नागिरीत प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी अभिनंदन केले. Overseas Deployment Camp
ओव्हरसिज डिप्लॉयमेंट कॅंपमध्ये भारतातील दहा राज्यांतून दहा एनसीसी छात्रांची निवड केली जाते. त्याची पहिली मुलाखत महाराष्ट्र एनसीसी युनिटमध्ये घेण्यात आली. नंतर दोन ऑनलाइन मुलाखती झाल्या. त्यात महाराष्ट्रातून व कोकणात प्रथमच निवड झाली. या कॅंपअंतर्गत आयएनएस सुजाता या नौकेतून सौरभला ओमान (Oman), एरेट्रिया (Eritrea), जिबुती(Djibouti), इजिप्त (Egypt) व सौदी अरेबिया (Saudi Arabia) या पाच देशांत जाण्याची संधी मिळाली. या देशांत ते प्रत्येकी दोन दिवस वास्तव्यास होते. भारतीय नौसेनेतील योगदानाची माहिती अन्य देशांना मिळण्याकरिता असे कॅंप आयोजित केले जातात. ऑनबोर्ड ट्रेनिंग, फायरिंग, मशिनरी ट्रेनिंग या कॅंपमध्ये दिले गेले.Overseas Deployment Camp
सौरभने सांगितले की, कॅंपमध्ये सर्व शिस्तबद्ध वातावरण असते. पहाटे ५.३० ला उठून नित्यनियमित व्यायाम, संचलन यासह विविध प्रकारची प्रशिक्षणे दिली गेली. कडक शिस्तीतच सर्व गोष्टी होत असतात. सैन्यातील अधिकाऱ्यांशी बोलायचे कसे, अधिकारी पदासाठी कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात, त्यांची तयारी संबंधी या वेळी माहिती देण्यात आल्याचे सौरभने सांगितले. Overseas Deployment Camp
लेफ्टनंट अरुण यादव, लेफ्टनंट कमांडर डी. डी. सरदेसाई यांच्यासमवेत सौरभची आई सौ. सुप्रिया लघाटे, वडिल संजय लघाटे, उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई, डॉ. विवेक भिडे, डॉ.अपर्णा कुलकर्णी, डॉ. यास्मिन आवटे आदी अभिनंदनासाठी उपस्थित होते. सौरभचे मूळ गाव आरवली आहे. सौरभचे बारावी (विज्ञान) पर्यंतचे शिक्षण डेरवणला झाले. इंग्रजी विषय आवडीचा असल्याने त्याने प्रथम वर्ष बीएसाठी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्याची आई डेरवणला प्राथमिक शिक्षिका असून वडिल चिपळुण डेपोमध्ये एसटी मेकॅनिक आहेत. Overseas Deployment Camp