• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 October 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

संकट काळात BSNL कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर

by Guhagar News
July 29, 2023
in Bharat
90 1
0
Out of BSNL coverage area during crisis
177
SHARES
505
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

महिन्यातील जेमतेम १५ दिवसच सेवा

गुहागर, ता. 29 :  गेले ३/४ दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित झालेले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे सर्वच नद्या दुथडी भरुन वहात आहेत. अशातच अत्यावश्यक सेवेत येणा-या भारत संचार निगम लिमिटेडची (BSNL) ची मोबाईल सेवा मात्र बंद पडल्याने ग्राहकांत संताप व्यक्त होत आहे. Out of BSNL coverage area during crisis

सध्या जवळपास सर्वांच्याच हातात मोबाईल फोन पहायला मिळतो. प्रत्येक जण याच सेवेवर अवलंबुन असतो. संकटकाळात सरकार कडुन Helpline क्रमांक दिले जातात. मात्र मोबाईलला नेटवर्कच नसेल तर मदतीसाठी कसा फोन करायचा? असा प्रश्न ग्राहक विचारत आहेत. गेले ३/४ दिवस मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी रस्ते खचले आहेत तर काही ठिकाणी दरडी कोसळत आहेत मात्र BSNL चे नेटवर्क अनेक भागात “नॉट रिचेबल” आहे. Out of BSNL coverage area during crisis

BSNL चे सार्वाधिक ग्राहक ग्रामिण भागात आहेत. खाजगी कंपन्यानी आपली 5G सेवा सूरु केली आहे मात्र BSNL अजुन 2G/3G च्या पुढे सरकताना दिसत नाही. याबद्दल कमालीची अनास्था या कंपनीत पहायला मिळते. BSNL चे मासिक रिचार्ज प्लॅन खाजगी मोबाईल कंपन्यांच्या तुलनेने खुप स्वस्त आहेत मात्र महिन्यातील जेमतेम १५ दिवस सुरळीत सेवा देणा-या या सरकारी कंपनीच्या रिचार्ज चा हिशेब खाजगी कंपन्याच्या प्लॅंन्सच्या बरोबरीनेच होतो. Out of BSNL coverage area during crisis

 लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष BSNL ची मोबाईल सेवा हि केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने सुरळीत सेवा देता येत नाही अशी ओरड या कंपनीत नेहमीच ऐकायला मिळते. लोकप्रतिनिधी मात्र या समस्येकडे सोयिस्कर डोळेझाक करत असल्याने ग्राहक नाराज आहेत. “डिजिटल इंडिया” च्या माध्यमातुन सरकार ने ग्रामीण भागाला मोबाईल/इंटरनेट सेवेने जोडणे आवश्यक होते मात्र तसे होताना दिसत नाही. Out of BSNL coverage area during crisis

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarOut of BSNL coverage area during crisisटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share71SendTweet44
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.