मारुती छाया क्रिकेट संघातर्फे दोन दिवसीय ओपन अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा
गुहागर, दि. 22 : खालचापाट येथील मारुती छाया क्रिकेट संघ गुहागर. व नगरपंचायतीच्या प्रभाग क्र. 16 मधील कार्यतत्पर नगरसेवक अमोल गोयथळे. यांच्या सहकार्याने गुहागर खालचापाट भाटी येथे दि. 26 व 27 फेब्रुवारी 2022 रोजी ओपन अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. Organizing Corporator Cup at Khalchapat

स्पर्धेतील विजेत्या संघास 7007/- रुपये रुपये व चषक तर उपविजेत्या संघास 5005/- रुपये व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, सामनावीर, मालिकावीर अशी चषके ठेवण्यात आली आहेत. Organizing Corporator Cup at Khalchapat
खालचापाट येथील मारुती छाया क्रिकेट संघ गेली अनेक वर्षे क्रिकेट क्षेत्रात कार्यरत आहे. बॉक्स अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेत या संघाने सलग 18 वेळा विजेतेपद प्राप्त केले आहे. या संघातील नवोदित खेळाडूही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आहे. नगरसेवक चषक स्पर्धेत तालुक्यातील अनेक संघांनी सहभाग घेतला आहे. Organizing Corporator Cup at Khalchapat
माजी आरोग्य व स्वच्छता समिती सभापती तथा विद्यमान नगरसेवक अमोल गोयथळे. यांच्या सहकार्याने ही तालुकास्तरीय स्पर्धा दिमाखदार पद्धतीने पार पडणार आहे. तरी या स्पर्धेचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन मारुती छाया क्रिकेट संघाच्या वतीने करण्यात आले आहे. Organizing Corporator Cup at Khalchapat

