• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
23 December 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिल्ह्यात इस्त्राईल तंत्रज्ञानाने फुलणार फळबाग

by Mayuresh Patnakar
July 20, 2022
in Ratnagiri
16 0
0
Orchards on barren farmland

मार्गताम्हाने माळरानावर ३ एकर क्षेत्रात इस्त्राईल तंत्रज्ञानाने केलेली फळलागवड.

32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मार्गताम्हाने येथील ओसाड माळरानावर केली आंबा, काजू लागवड

गुहागर, ता. 20 : जिल्ह्यात फळलागवडीचे नवनवीन तंत्रज्ञान शेतकरी आत्मसात करताना दिसून येत आहेत. चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने खुर्द येथील एका शेतकऱ्याने इस्त्राईल तंत्रज्ञान वापरत आपल्या ३ एकर क्षेत्रात फळबाग लागवड केली आहे. यामध्ये १ हजार केशर आंबा व ५०० वेंगुर्ला-७ काजू रोपांची लागवड करुन फळलागवडीचा एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. Orchards on barren farmland

कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे साधन म्हणून इस्त्राईल तंत्रज्ञानाने फळबाग लागवड केली. तर त्याचा हमखास फायदा होतो हे ओळखून मार्गताम्हाने खुर्द येथील देविदास गुणाजी चव्हाण या शेतकऱ्याने फळलागव़डीची अनोखी संकल्पना राबविण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यानुसार त्यांनी आपली दोन मुलगे शैलेश व सागर चव्हाण यांच्या सहकार्यातून हा प्रयोग यशस्वी केला आहे. पारंपरिक लागवडीमध्ये १ एकरमध्ये आपण फक्त ४० कलमे लावतो व त्याची फळधारणा होण्यासाठी खूप अवधी लागत होता. परंतु इस्त्राईल पध्दतीने लागवड केल्यास १ एकरामध्ये आपण १२०० केसर कलम लावू शकतो. व तिसऱ्या वर्षी उत्पन्न सुरु होते. ही लागवड करताना आंबा हा ३ फूट बाय १२ फूट वर करण्यात येतो. तसेच काजू ६ फूट बाय १४ फूट वर लागवड करण्यात येते. तसेच या बागेमध्ये विविध प्रकारचे आंतरपीकही शेतकरी घेऊ शकतो. Orchards on barren farmland

Orchards on barren farmland
मार्गताम्हाने माळरानावर ३ एकर क्षेत्रात इस्त्राईल तंत्रज्ञानाने केलेली फळलागवड.

मार्गताम्हाने खुर्द येथील शेतकरी देविदास चव्हाण यांनी पद्मवन अँग्रो फार्मची निर्मिती करुन कोकणात हा नाविन्यपूर्ण प्रयोग केला आहे. आपल्या ३ एकर क्षेत्रावर ही लागवड केली आहे. केशर आंबा १ हजार व ५०० वेंगुर्ला काजू यांची लागवड केलीच आहे. शिवाय जगातील सर्वात महाग असा मियाझाकी आंबा, टाँमी एटकिंग आंबा यांचीसुध्दा लागवड केली आहे. या फार्मच्या माध्यमातून कोकणातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण व प्रोत्साहन देण्याचा त्यांचा मानस आहे. Orchards on barren farmland

Orchards on barren farmland
मार्गताम्हाने खुर्द येथील देविदास गुणाजी चव्हाण

फळलागवडीतून मार्गताम्हाने गाव वणवामुक्त होईल

मार्गताम्हाने हा सपाट जमिनीचा भाग आहे. अशा माळरानावरील सुपिक जमिनीत अलिकडे शेती करणे बहुसंख्य लोकांनी टाळले आहे. या जमिनी ओसाड असून दरवर्षी पावसाळ्यानंतर या भागात वणवे जातात. वनसंपदा राख होते. त्यामुळे अशा ओसाड जागेवर सर्वच जमीनदार शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केल्यास गाव वणवामुक्त नक्कीच होईल व इतर गावांसमोर एक आदर्श राहिल असा आत्मविश्वास शेतकरी देविदास चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. Orchards on barren farmland

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarOrchards on barren farmlandटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.