अनंतरावजी गीते कौशल्य विकास संस्थेची स्थापना
गुहागर, ता. 16 : आबलोलीतील लोकशिक्षण मंडळ या संस्थेतर्फे अनंतरावजी गीते कौशल्य विकास संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेमार्फत 7 तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांना सुरवात होत आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत बाईत यांनी दिली. Opportunity for technical education in Abaloli


नव्या अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी लोकशिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बाईत म्हणाले की, लोकशिक्षण मंडळ आबलोली या संस्थेची 22 जानेवारी 1967 ला स्थापना झाली. माध्यमिक विद्यालयाच्या रुपाने शिक्षण क्षेत्रात काम सुरु झाले. गेल्या 55 वर्षात कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, अध्यापक विद्यालय याबरोबरच कार्यालयीन व्यवस्थापन, मार्केटींग ॲण्ड रिटेल मॅनेजमेंट असे व्यावसायिक अभ्यासक्रम या संस्थेने सुरु केले. या संस्थेने 2017 मध्ये सुवर्ण महोत्सव साजरा केला. त्यावेळी खासदार अनंत गीते यांनी या शिक्षणसंस्थेला 30 लाखाचा निधी दिला. या निधीमधुन इथल्या तरुणांना रोजगार मिळणारे दालन सुरु करावे म्हणून तंत्रशिक्षण क्षेत्रातील अभ्यासक्रम सुरु करत आहोत. यासाठी आवश्यक सर्व परवानग्या आता प्राप्त झाल्या आहे. खासदार गीतेंनी मोठे आर्थिक पाठबळ दिले. म्हणून या संस्थेचे नाव अनंतरावजी गीते साहेब कौशल्य विकास संस्था असे ठेवले आहे. Opportunity for technical education in Abaloli


अनंतरावजी गीते साहेब कौशल्य विकास संस्थामध्ये फॅशन डिझायनिंग (कालावधी 6 महिने, शैक्षणिक पात्रता 7 वी उत्तीर्ण ), ट्रव्हल ॲण्ड टुरिझम (कालावधी 6 महिने, शैक्षणिक पात्रता 10 वी उत्तीर्ण ), वेल्डींग ॲण्ड जॉइन्टींग ((कालावधी 6 महिने, शैक्षणिक पात्रता 7 वी उत्तीर्ण ), नर्सिंग केअर (कालावधी 1 वर्ष, शैक्षणिक पात्रता 10 वी उत्तीर्ण ), हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्नोलॉजी ((कालावधी 1 वर्ष, शैक्षणिक पात्रता 12 वी उत्तीर्ण ), पॅथॉलॉजी टेक्निशियन ((कालावधी 1 वर्ष, शैक्षणिक पात्रता 10 वी उत्तीर्ण ) आणि डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन (कालावधी 2 वर्ष, शैक्षणिक पात्रता 10 वी उत्तीर्ण ) असे अभ्यासक्रम सुरु करत आहोत. Opportunity for technical education in Abaloli
आम्ही 12 अभ्यासक्रमांसाठी मागणी केली होती. मात्र तंत्रशिक्षण मंडळाने सुरुवातीला 7 अभ्यासक्रमांना मंजुरी दिली आहे. तीन वेळा वेगवेगळ्या पथकांनी इमारत, अभ्यासक्रमासाठी आवश्यक भौतिक, पायाभूत सुविधा आदीची तपासणी केल्यानंतर हे अभ्यासक्रम सुरु करण्यास परवानगी दिली आहे. गुहागर तालुक्यातील तरुण तरुणींना स्वयंरोजगार आणि रोजगाराची संधी देणाऱ्या कौशल्य विकास अभ्यासक्रमांचे हे दालन आबलोलीत सुरु झाले आहे. शासनाच्या धोरण आणि नियमांप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे काम सुरु झाले आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन यावेळी चंद्रकांत बाईत यांनी केले. Opportunity for technical education in Abaloli
या पत्रकार परिषदेला लोकशिक्षण मंडळ आबलोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन बाईत, सचिव राकेश साळवी, संचालक अविनाश कदम आदी उपस्थित होते. Opportunity for technical education in Abaloli