खा. तटकरे : खेडकर हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन
गुहागर, ता.14 : तालुक्यातील अंजनवेल बोरभाटलेवाडी येथील युसूफ मेहेरअली सेंटरच्या प्रिन्स चित्रेश व नेनेस्का खेडकर हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटर व आंतररूग्ण विभागाचे उद्घाटन खा. तटकरे (MP. Tatkare) यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. केवळ शहरी भागच नव्हे तर देशातील संपूर्ण ग्रामीण भागातही वैद्यकीय सेवा देण्याचे कार्य युसुफ मेहेरअली सेंटर करीत आहे. असे गौरवोद्गार खा. सुनील तटकरे यांनी केले. तसेच ऍन्रॉन प्रकल्प बंद पडल्यास स्थानिक कर्मचाऱ्यांवर रोजगाराचे मोठे संकट उद्भवेल. Operation Theater at Khedkar Hospital
यावेळी खा. तटकरे म्हणाले, युसूफ मेहेरअली सेंटरचे कार्य मोठे आहे. कारण, आपण जवळून पाहिले आहे. वयाच्या ९८ वर्षीही प्रचंड इच्छा शक्ती असलेले युसूफ मेहेरअली सेंटरचे अध्यक्ष डॉ. जी. जी. परेख यांनी लोकसेवा कशी सुरू ठेवावी याचे जिवंत उदाहरण या हॉस्पिटलमधून दिले आहे. Operation Theater at Khedkar Hospital
यावेळी गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल, आरजीपीपीएलचे प्रमुख आसिमकुमार सामंता, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, तहसिलदार प्रतिभा वराळे, डॉ. संदीप जाधव, डॉ. श्यामसुंद भाकर, डॉ. राजेंद्र पवार, यशवंत बाईत, डॉ. रामेश्वर गोंड, अनिल हेब्बर, डॉ. परमेश्वर गोंड, डॉ. लक्ष्मण येमे आदी उपस्थित होते. Operation Theater at Khedkar Hospital