6 परिसंवाद, तज्ञांचा सहभाग, विनाशुल्क विचार ऐकण्याची संधी
रत्नागिरीः पर्यावरणातून शाश्वत विकास, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, सायबर सुरक्षा इत्यादी विषयांवर नामवंत अभ्यासकांचे विचार ऐकण्याची संधी रत्नागिरीकरांना उपलब्ध झाली आहे. येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात (बीएड कॉलेज) आयोजित केलेल्या विविध विषयांवरील वेबिनारच्या माध्यमातून या विषयांवरील चर्चासत्रे आठवडाभर पार पडतील. ही सर्व सत्रे विनाशुल्क असून विद्यार्थी, प्राध्यापक यांसह जिज्ञासू नागरिकांनाही त्यात सहभागी होता येईल, असे या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रमा भोसले यांनी कळविले आहे. Online Seminars in BEd college
फेब्रुवारी महिन्याच्या ८ ते ११ तसेच २२ आणि २३या तारखांना ही ऑनलाईन चर्चासत्रे होतील. सकाळी १० ते ४अशी चर्चासत्रांची वेळ असेल. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते अकरा या वेळेत त्यांत सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्यात येईल. त्यानंतर प्रत्येक सत्राच्या प्रारंभी प्राचार्या डॉ. रमा भोसले यांचे उद्घाटनाचे भाषण आणि सव्वा अकरा ते बारा या वेळेत बीजभाषण होईल. त्यानंतर बारा ते दीड आणि दोन ते साडेतीन या वेळेत त्या त्या विषयांवरील चर्चासत्रे होतील. प्रत्येक व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरे होतील. Online Seminars in BEd college
उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक, शालेय स्तरावर काम करणारे शिक्षक , शिक्षक प्रशिक्षणार्थी, विचारवंत, समाजसेवक, शिक्षतज्ज्ञ इत्यादींना यामध्ये सहभागी होता येईल. विविध महाविद्यालयांतील अनुभवी प्राध्यापक, विद्यापीठातील विभागप्रमुख, स्वयंसेवी संस्थांतील तसेच त्या त्या क्षेत्रातील अनुभवसंपन्न व्यक्ती या वेबिनारकरिता तज्ज्ञ म्हणून लाभणार आहेत. वेबिनारसाठी नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही तरी विविध क्षेत्रातील इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा. सहभागी होणाऱ्यास ई-प्रमाणपत्रे देण्यात येईल. Online Seminars in BEd college
या वेबिनारचे नियोजनासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रमा भोसले , समन्वयिका डॉ. राजश्री देशपांडे, महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. जोत्स्ना ठाकूर, डॉ. उज्ज्वला डोणे, डॉ. तारासिंग नाईक, श्री.प्रवीण चाकोते, ग्रंथपाल डॉ. रामदास लिहीतकर तसेच कोलते कॅम्प्युटर इ.परिश्रम घेत आहेत. Online Seminars in BEd college
पुढे दिलेली क्रमांक (१) ची लिंक वापरून नोंदणी करता येईल आणि क्रमांक (२) ची लिंक वापरून सहभागी होता येईल.
(१) https://forms.gle/nnR7xCMVnpuphE8CA
(२) https://meet.google.com/dds-vmnu-xzk
या वेबिनारमध्ये पुढील विषयांवर चर्चा होतील.
• पर्यावरणातून शाश्वत विकास (८/२/२०२२)
बीजभाषण : डॉ. नूतन चव्हाण;
वक्ते :- डॉ. सुरेन्द्र ठाकुरदेसाई, डॉ. अंकुश बनसोडे
• राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (९/२/२०२२)
बीजभाषण : डॉ. एच. एन. जगताप
वक्ते : श्री. रवींद्र कांबळे, डॉ. रामचंद्र व्हनभट्टे
• सायबर सुरक्षितता (१०/२/२०२२)
बीजभाषण आणि सत्र मार्गदर्शन : श्री. सिद्धार्थ मयेकर
• ओळख स्वतःच्या व्यक्तिमत्वाची (११/२/२०२२)
बीजभाषण : डॉ. अपर्णा अष्टपुत्रे सिसोदे
वक्ते : डॉ. वसुधा विनोद देव, श्रीमती वृषाली भट
• लिंगभाव संवेदनशीलता (२२/२/२०२२)
बीजभाषण : डॉ. नीलिमा सप्रे
वक्ते : डॉ. मेघा उपलानी, श्रीमती तनुजा सिरपुरकर
• संदर्भ व्यवस्थापन साधनांचा वापर (२३/२/२०२२)
बीजभाषण : प्रा. डॉ. सदानंद बनसोडे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
वक्ते : डॉ. शालिनी लिहीतकर (सहयोगी प्राध्यापक, आर. टी. एम. नागपूर विद्यापीठ)