वेबिनारमध्ये तीन जिल्हातील साडेसातशे विद्यार्थी व पंधरा विभाग प्रमुखांचा सहभाग
गुहागर, दि. 05 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर. (Maharshi Parashuram College of Engineering Velneshwar) तर्फे ऑनलाईन औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते. सदर औद्योगिक क्षेत्र भेट ‘साखर कारखान्यात होणाऱ्या विविध तांत्रिक कार्य प्रणाली’ या विषयावर पार पडली. राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री जयंत पाटील यांच्या सांगली येथील साखर कारखानाचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला. Online Industrial Area Visit


यावेळी साखर कारखान्यात असणाऱ्या विविध विभाग क्रेन कॅरियर, शुगर केन क्रशर, ज्यूस हाऊस, बॉयलर, पॉवर हाऊस, बॉईलिंग हाऊस, सेंट्रिफ्यूगल सेक्शन, शुगर क्रिस्टलाइजर तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या हाय व्होल्टेज इंडेक्शन मोटरची कार्य प्रणाली, टेंपरेचर डिटेक्टर, कंट्रोल पॅनल त्याचप्रमाणे सध्याच्या आधुनिक साखर कारखान्याच्या औद्योगिक स्वयंचलित उपकरणांमध्ये प्रोग्रॅमिंग आणि कमिन्सिंग कसे केले जातात. यावर सविस्तर विवेचन करून विद्यार्थ्यांना वरील सर्व विभागांची लाईव्ह वर्किंग दाखविण्यात आले. त्याचप्रमाणे साखर औद्योगिक क्षेत्रामध्ये करिअरची सुरुवात कशी करावी. व त्या क्षेत्रात नोकरी करण्यासाठी कोणकोणती कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहेत. यावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. Online Industrial Area Visit
या वेबिनारमध्ये ठाणे, रायगड व रत्नागिरी जिल्हातल्या सहा तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) च्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिविल इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेटेंशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग व् इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग (Mechanical Engineering, Civil Engineering, Instrumentation & Control Engineering, Electrical Engineering & Electronics & Telecommunication Engineering) विभागाच्या अंतिम वर्षातील साडेसातशे विद्यार्थी व पंधरा विभाग प्रमुखांनी सहभाग नोंदविला. Online Industrial Area Visit
सदर औद्योगिक क्षेत्र भेटीसाठी महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग वेळणेश्वर (Maharshi Parashuram College of Engineering Velneshwar), इन्स्ट्रुमेटेंशन विभागाचे प्रा. केशव ज. चौगुले यांनी तज्ञ व्याख्याते, प्रशिक्षक व समन्वयक म्हणून प्रभावी काम पाहिले. सदर उपक्रम इन्स्ट्रुमेटेंशन अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख प्रा. केतन कुंडीया व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. अविनाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे संपन्न झाला. Online Industrial Area Visit

