• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 July 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

2 रुपयांत फसला, 94 हजार घालवून बसला

by Mayuresh Patnakar
April 12, 2022
in Guhagar
16 0
0
Online cheating of women
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कुरिअर करण्याच्या बहाण्याने महिलेची ऑनलाईन फसवणूक

गुहागर, ता. 12 :  आमच्या कंपनीत कुरियर करण्यासाठी नोंदणी करावी लागते. आम्ही पाठवतो त्या लिंकवर नोंदणी करा. सुरवातीला फक्त दोन रुपये पाठवा. असे सांगून घोळात घेतले आणि ओटीपी आला असला तर सांगा असेही चोरांनी सहज विचारले. अनेकवेळा व्यवहार करणाऱ्या व्यक्तीने ओटीपी सांगितला आणि अवघ्या 10 मिनिटात ऑनलाइन चोरांनी सदर इसमाच्या बँक खात्यातून 93 हजार 999 एवढी रक्कम लंपास केली. Online cheating of women

सदर प्रकार शनिवार, ता. 9  एप्रिलला घडला. गुहागर तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक मिडियाशी संबधीत केसरी विश्वनाथ नागवेकर (वय 43) यांनी याबाबतची तक्रार गुहागर पोलीस ठाण्यात केली आहे. या तक्रारीनुसार, हेदवतड येथे आलेल्या केसरी नागवेकर यांच्या पत्नीला पुण्यामध्ये तातडीने कुरीअर करायचे होते. म्हणून त्यांनी गुगल सर्चवर कुरिअर कंपनी शोधली. त्या कंपनीच्या माहितीमध्ये एक मोबाईल क्रमांक सापडला. सदर मोबाईलवर त्यांनी फोन केला. मात्र हा फोन कोणीही उचलला नाही. पाच मिनिटांच्या अवधीत नागवेकर वहिणींना अन्य मोबाईलवरुन फोन आला. तुम्ही कुरिअरची चौकशी करत आहात ना, आमचा तो फोन बंद आहे. असे सांगून मोबाईलवर बोलणाऱ्या अज्ञात व्यक्तींने तुम्हाला कुरिअर करायचे असेल तर तुम्हाला प्रथम नोंदणी करावी लागेल. तुमच्या मोबाईवर मी लिंक पाठवत आहे. त्याद्वारे तुम्ही नोंदणी करा. तसेच देवघेवीचा व्यवहार पडताळण्यासाठी फक्त दोन रु. पाठवा. असे सांगितले. Online cheating of women

नागवेकर वहिनींनी आपल्या पतीला ही सर्व गोष्टी सांगितली. लगेच नागवेकर यांनी लिंक उघडली. नोंदणीचा फॉर्म भरत असताना पुन्हा अज्ञात व्यक्तीचा चौकशीसाठी फोन आला. सदर अज्ञात व्यक्तीने गप्पाच्या ओघात 2 रु. पाठविण्यासाठी बँकेतून आलेला ओटीपी विचारला. नागवेकर यांनी अनाहुतपणे ओटीपी दिला. Online cheating of women

त्यानंतर थोड्या वेळाने नागवेकर यांच्या बँक खात्यातून 49 हजार 999/-  काढले गेल्याचा संदेश आला. त्यावेळी नागवेकर यांना आपण केलेली चूक आठवली. इतक्यात पुन्हा 44 हजार काढण्याला संदेश आला. एकूण 93 हजार 999/- इतकी रक्कम नागवेकर यांच्या खात्यातून काढण्यात आली होती. Online cheating of women

केसरी नागवेकर यांनी याबाबत गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरुन अज्ञात व्यक्तीविरोधात भा. दं. वि. कलम 419, 420 आय.टी. ऍक्टचे कलम 66 (क) (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत. Online cheating of women

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarOnline cheating of womenटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.