१० लाखांचा अपघात विमा
गुहागर, ता. 25 : आपला जीव धोक्यात घालून विषारी सापांना पकडण्याचं काम सर्पमित्र करत असतात. बऱ्याच वेळा साप पकडत असताना सापाने दंश केल्यामुळे सर्पमित्रांना आपला जीव गमवावा लागतो. पण आता सर्पमित्रांना अधिकृत ओळखपत्र व १० लाखांचा अपघात विमा देण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. तसेच सर्पमित्रांना ‘फ्रंटलाइन वर्कर’चा दर्जा दिला जाईल, याबद्दल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस केली आहे. Official identity card for Sarpamitra

ग्रामीण भागात वन्यजीव आणि मानवी संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने, विशेषतः सापांचा धोका टाळण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणाऱ्या सर्पमित्रांच्या सेवांचा आदर करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरु केला जात आहे. लवकरच या कार्यकर्त्यांना अधिकृत ओळखपत्रासोबत १० लाख रुपयांचा अपघात विमा प्रदान केला जाणार आहे. सरकारी अधिकाऱ्यांद्वारे सुरुवातीपासूनच प्रस्तावित या उपक्रमात, सर्पमित्रांना ‘अत्यावश्यक सेवा’ आणि ‘फ्रंटलाइन वर्कर’च्या दर्जाने मान्यता देण्यात येत असून, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली. Official identity card for Sarpamitra

याबाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस करण्यात येणार आहे. या शिफारशीमुळे या सेवा कार्यकर्त्यांना अधिकृत आणि मान्यताप्राप्त दर्जा प्राप्त होईल, ज्यामुळे त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेची खात्री होईल’ असं बावनकुळे म्हणाले. कित्येकदा सर्पमित्र अत्यंत जोखमीचे काम करत असतात आणि अनेकदा साप पकडताना त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत त्यांना आर्थिक संरक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे. या निर्णयामुळे सर्पमित्रांच्या कामाला प्रोत्साहन मिळणार असून आणि त्यांना सुरक्षितपणे काम करण्यास मदत देखील होणार आहे. Official identity card for Sarpamitra