सत्यवान रेडकर: कला, क्रीडा क्षेत्रात राज्य पातळीवर यश मिळवावे
गुहागर, ता. 18 : तळवली येथील श्री सोमनागेश्वर मंदिर येथे तळवली ग्रामपंचायतच्यावतीने मोफत शासकीय स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी सीमाशुल्क भारत सरकार व तिमिरातून तेजाकडे संस्थेचे संस्थापक सत्यवान रेडकर (Satyawan Redkar) यांनी उपस्थितांना स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन केले. Officers should be created in Konkan


कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिभा आहे. येथील विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळाली तर कोकणच्या मातीतून अनेक प्रशासकीय अधिकारी निर्माण होतील. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षा द्याव्यात. असे आवाहन कनिष्ठ अनुवाद अधिकारी मुंबई, सीमाशुल्क भारत सरकार व तिमिरातून तेजाकडे संस्थेचे संस्थापक सत्यवान रेडकर (Satyawan Redkar) यांनी केले. तळवली येथील श्री सोमनागेश्वर मंदिर येथे तळवली ग्रामपंचायतच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनावेळी ते बोलत होते. Officers should be created in Konkan


सामाजिक कार्यकर्ते महेश शिगवण यांच्या विशेष सहकार्याने व पुढाकाराने हे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी पुढे बोलताना श्री रेडकर म्हणाले की, मी स्वतः खडतर प्रवास केला आहे. त्यामुळे नेहमी विद्यार्थ्यांनी मेहनत केली पाहिजे तसेच विविध स्पर्धा परीक्षाकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे. अनेक वेळा काही विद्यार्थी विशिष्ट कलेत पारंगत असतात अशा विद्यार्थ्यांनी आपल्या कलेतून पुढे जाणे गरजेचे आहे. तालुकास्तरावर, राज्यस्तर अशा ठिकणी आपल्या कलेत यशस्वी होऊन विशेष कोट्यातून शासकीय भरतीतुन प्रशासकीय नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. यावेळी श्री रेडकर (Satyawan Redkar) यांनी विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या पद्धतीने व खेळीमेळीत हे मार्गदर्शन केले. Officers should be created in Konkan
या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनावेळी तळवली ग्रामपंचायत सरपंच मयुरी शिगवण, ग्रामपंचायत सदस्य संतोष जोशी, सुनील मते, सचिन कळंबाटे, पूर्वा पवार, सौ शिंदे, ग्रामविकास अधिकारी श्री बागुल, तळवली गटविकास मंडळ अध्यक्ष विनायक मुळे, न्यु इंग्लिश स्कुल तळवलीचे प्राचार्य बसवंत थरकार, शिक्षक वर्ग, सामाजिक कार्यकर्ते महेश शिगवण, गुरुनाथ कारेकर आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तकुमार शिगवण व प्राध्यापक अमोल जडयाळ यांनी केले. Officers should be created in Konkan