• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 January 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

“देवखेळ” वेब सीरीजच्या टीझरमधुन संकासुर देवाबाबत आक्षेपार्य विधान

by Guhagar News
January 29, 2026
in Guhagar
216 2
1
Objectionable statement about Sankasur Dev
425
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर तालुक्यातून संतप्त प्रतिक्रिया; झी 5 मराठी वर कारवाईची मागणी

गुहागर, ता. 29 : झी 5 मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील “देवखेळ” वेब सीरीजच्या टीझरमधुन संकासुर देवाबाबत अपमानकारक व धार्मिक भावना दुखावणारा मजकुर प्रसारित केल्याबाबत गुहागर तालुक्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यामुळे BNS व IT Act अंतर्गत संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन गुहागर  तालुकावासियांच्या वतीने गुहागर पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आले आहे. Objectionable statement about Sankasur Dev

देवखेळ या वेब सिरीजच्या टिझर मधील विधानाबाबत तालुक्यातून संतप्त भावना उमटल्या आहेत. सर्वांनी एकत्र येऊन याबाबत निषेध नोंदविला आहे. तर गुहागर पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आलेल्या निवेदनामध्ये आम्ही गुहागर तालुक्यातील रहिवासी असुन संकासुर हा गुहागर परिसरातील प्राचीन व श्रध्दास्थान असलेला देव आहे.  शिमगोत्सवामध्ये हजारो भाविक त्याची श्रध्देने उपासना करतात. संकासुर देवाबाबत भाविक वर्गात अत्यंत आदर व धार्मिक भावना आहेत. Zee5Marathi या OTT प्लॅटफॉर्मवर ‘देवखेळ’ नावाची वेब सीरिज दिनांक ३० जानेवारी रोजी प्रदर्शित होणार असुन, त्याचा टीझर सध्या सोशल मीडियावर प्रदर्शित व मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. सदर टीझरमध्ये संकासुर देवाबाबत बदनामीकारक, अपमानकारक व देवत्वाबाबत संभ्रम निर्माण करणारे संवाद दाखवण्यात आले आहेत. विशेषतः “संकासुर शिक्षा करतो. बळी घेतो” असे संवाद कलाकारांच्या तोंडी देवून संकासुर हा अत्यंत क्रूर जालीम देव असुन तो शिक्षा म्हणुन लोकांचे बळी घेतो. असा संभ्रम जनमानसांच्या मनात तयार होत आहे. Objectionable statement about Sankasur Dev

Objectionable statement about Sankasur Dev

 Zee5 या ऑफिशियल युट्युब चॅनेलवर दिनांक २१/०१/२०२६ रोजी Devkhel| Official Trailer | Marathi ZEES Original | Ankush C. Prajakta M, Arun N Pre 30th Jan असे Title देवुन २.१५ मिनिटांचा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे त्या व्हिडिओची ऑफिशियल Url Link https://youtu.be/1tJGtvqrEYQ?si=Kv2vivwnDtRXEvAy अशी आहे. सदरच्या व्हिडिओमध्ये, “पाप केलं आहे त्याला संकासुर शिक्षा करतो, शिक्षा करतो म्हणजे त्याचा बळी घेतो, संकासुराने शिक्षा दिली आहे त्याला, असे गाववाले म्हणतात, हे सगळे संकासुर करतो, होळीत दरवर्षी खुन करण्याची प्रथा आहे” अशी बदनामीकारक वाक्य जाणीवपुर्वक प्रसारित करण्यात आलेली आहेत. सदरचा व्हिडिओ आतापर्यंत ८,४४,६४१ लोकांनी पाहिला असुन त्याला ६५०० लोकांनी लाईक केलेले आहे. त्यामुळे या बदनामीकारक व्हिडिओचे संपुर्ण देशभर प्रसारण झालेले आहे. त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. Objectionable statement about Sankasur Dev

वरील संवादामुळे संकासुर देवाची प्रतिमा क्रूर, अमानवी व अंधश्रध्देशी जोडलेली असल्याप्रमाणे दाखवली गेली असुन, हे जाणीवपुर्वक धार्मिक भावना दुखावणारे आहे. सदर टीझर सोशल मीडिया व डिजिटल माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाल्यामुळे संकासुरला मानणारा भाविक वर्ग प्रक्षोभित झाला आहे. समाजात असंतोष  निर्माण झाला आहे. आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. आरोपीनी (Zee Marathi व संबंधित Production House यांनी) जाणीवपूर्वक व  द्वेषपूर्वक धार्मिक भावना दुखावण्याचा उद्‌देशाने हा मजकुर प्रसारित केला असुन, तसेच Information Technology Act व IT Rules, 2021 वे उल्लंघन केले आहे. Objectionable statement about Sankasur Dev

 तरी सदर वेब-सीरिज चे प्रोड्युसर Zee5 आणि दिग्दर्शक चंद्रकांत लता भायकवाड यांचे विरूध्द भारतीय न्याय संहिता कलम २९९ (भारतीय दंड संहिता कलम 295A) प्रमाणे आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा. आणि सदरचा ट्रेलरचा व्हिडिओ ताबडतोब थांबवण्यात यावा. अशी मागणी करण्यात आली आहे. Objectionable statement about Sankasur Dev

यावेळी निवेदन देताना अँड. संकेत साळवी, सोहम सातार्डेकर, अरुण परचुरे, जगन्नाथ शिंदे, वैभव आदवडे, अमोल जामसुतकर, अमित कुबडे, सुहास सातार्डेकर, रोहन भोसले, संदीप भोसले, विलास कांबळे, पराग मालप यांच्यासह तालुक्यातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. सायंकाळी शहरातील श्री महापुरुष मंदिरामध्ये तालुक्यातील नमन मंडळातील सर्व सदस्यांना बोलावून बैठक पार पडली व या घटनेचा सर्वानुमते निषेध नोंदविण्यात आला. Objectionable statement about Sankasur Dev

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarObjectionable statement about Sankasur Devटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share170SendTweet106
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.