मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर आक्रमक
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 11 : तालुक्यातील जानवळे फाटा शेजारी कचऱ्याच्या ढिगा-यात शासनाचा पोषण आहार खिचडीची पाकीटे टाकल्याचा प्रकार नुकताच दिसून आला आहे. या प्रकाराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर हे आक्रमक झाले असून शाळेचा पोषण आहार की अंगणवाडीचा पोषण आहार याची शासनाने तात्काळ चौकशी करावी, अशी आग्रही मागणी विनोद जानवळकर यांनी केली आहे. Nutritional food packets in the trash


यासंदर्भात मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी आमच्या प्रतिनीधीशी बोलताना सांगितले की, महाराष्ट्र शासन बालकांना पोषण आहार शाळांमध्ये पुरवण्याचे काम करत आहे. मात्र त्याची एक्सपायर डेट संपण्याआधीच शासनाच्या ह्या पोषणा आहार खिचडीची पाकीटे कचऱ्याच्या ढिगार्यामध्ये आढळून आल्याची घटना घडली असून याची सखोल चौकशी करण्यात यावी. अन्यथ: महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक भूमिका पवित्रा घेणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी दिली. Nutritional food packets in the trash

