पोलिस निरीक्षक पाचपुते, एन.एस.एस.चे शिबीर अडूरला
Guhagar News : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गावाशी, समाजाशी एकरुप व्हावे. आपली ग्रामपंचायत, अन्य संस्था यांची रचना जाणून घ्यावी. त्यातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास घडेल. असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते यांनी केले. ते खरे ढेरे भोसले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी शिबीराच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. NSS Residential Camp of KDB College
Guhagar तालुक्यातील अडूर येथे खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी शिबीर होत आहे. या शिबीराचे उद्घाटन कार्यक्रमाला पोलिस निरीक्षक श्री तुषार पाचपुते, पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग कापले, सरपंच शैलजा गुरव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.NSS Residential Camp of KDB College
यावेळी बोलताना पांडुरंग कापले म्हणाले की, विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी किडा न होता विविध प्रकारच्या कामे केली पाहिजेत. अशा शिबीरातून होणारे श्रमसंस्कार केवळ गुणांसाठी नसून नेहमीच्या आयुष्यातही उपयोगी पडतील. त्याचबरोबर समाजासाठी आपण कायम उपयोगी राहु याकडेही लक्ष द्यावे. NSS Residential Camp of KDB College
प्र. प्राचार्य विराज महाजन म्हणाले की, राष्ट्राचे भावी नागरिक कसे असावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय सेवा योजना सुरु केली. दुसऱ्यासाठी झगडण्यामुळे जो अनुभव मिळतो यातून स्व:जळून पडते आणि जेव्हा स्व:गळून पडेल तेव्हा माणूस श्रेष्ठ होतो. त्यातून राष्ट्र उन्नत होते. शिबीर मैत्रीपूर्ण वातावरण होतानाच मर्यांदामध्ये रहाण्याचा संस्कार देणारेही आहे. श्रमदान-श्रमसंस्कार यातून विद्यार्थाचा विकास महत्त्वाचा आहे.NSS Residential Camp of KDB College
सरपंच शैलजा गुरव यांनी विद्यार्थांना निवासी शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा. वीर पाटील, प्रा. सौ. रश्मी आडेकर, अडूर गावातील ग्रामपंचायत सदस्य, वाडीप्रमुख, ग्रामस्थ, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य विराज महाजन, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.अनिल हिरागोंड उपस्थित होते. NSS Residential Camp of KDB College