राजकीय पक्षांना धक्का देत अपक्ष उमेदवारांने केला उमेदवारी अर्ज दाखल
गुहागर, ता. 14 : नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता ही लागली त्यानंतर 10 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात झाली. मात्र गेल्या चार दिवसांमध्ये एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. आज दिनांक 14/ 11/ 2025 रोजी पहिला अपक्ष उमेदवाराचा अर्ज गुहागर नगर पंचायती नगराध्यक्ष पदासाठी गुहागर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आला. एडवोकेट सुप्रिया सुरेश वाघधरे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज गुहागर नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी परीक्षित पाटील गुहागर यांच्याकडे दाखल केला. Nomination papers filed in Guhagar

एडवोकेट सुप्रिया सुरेश वाघधरे या पेशाने वकील असुन उच्चशिक्षित 2015 पासून त्या सोशल वर्क म्हणून काम करीत आहेत. तसेच सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्या अग्रेसर आहेत. सर्वप्रथम त्यांनी आज अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करून प्रबळ राजकीय पक्षांना एक मोठा अनपेक्षित धक्का दिला आहे. सुप्रिया वाघधरे यांच्या उमेदवारीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. पाच दिवसानंतर आज पहिलाच गुहागर नगराध्यक्षासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाला त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एडवोकेट सुप्रिया वाघधरे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीला सामोरे जायची तयारी केली आहे. Nomination papers filed in Guhagar