• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 December 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शहराला पाणी पुरवठा करणारी विहीर आटली

by Mayuresh Patnakar
June 5, 2023
in Guhagar
333 4
0
शहराला पाणी पुरवठा करणारी विहीर आटली
655
SHARES
1.9k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नगरपंचायतीचा पाणी पुरवठा ठप्प,  जनता हवालदिल

गुहागर, ता. 5 : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणी आटल्यामुळे No water to Guhagar city Today आज गुहागर शहरात पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे शहरवासीयांसह पर्यटन व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. मंगळवारी (ता. 6) सुरळीत पाणी पुरवठा व्हावा म्हणून गुहागर नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा विभाग व स्वच्छता विभागाचे 19 कर्मचारी युध्दपातळीवर काम करत आहेत. No water to Guhagar city Today

गुहागर शहराला पाणी पुरवठा करणारी विहीर मोडकाआगर धरणाच्या बाजूलाच आहे. विहीरला स्वतंत्र मोठे झरे नाहीत. धरणाचे पाणी विहिरीत आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.  विहिरीतील पाणी पंपाने खेचून गुहागर शहरातील विविध भागात असलेल्या टाक्यांमध्ये साठवले जाते. तेथून ग्रॅव्हिटेशनल फोर्सने हे पाणी कीर्तन वाडी, जांगळवाडी, खालचापाट, शिवाजी चौक, तेलेवाडी, बाजारपेठ, गुरुवाङी व वरचापाट या भागातील शहरवासीयांना पुरवले जाते. दररोज 24 तास 10 एच.पी.चे दोन पंप चालवून 2100 नळ जोडणीधारकांना सुमारे 16 ते 17 लाख लिटर पाणी पुरवले जाते. No water to Guhagar city Today

यंदा एप्रिल व मे मध्ये दरवर्षीपेक्षा सरासरी तापमान 1 ते 2 अंश सेल्सियने वाढले. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी कमी झाली. परिणामी विहीरीतील पाणी संपले. त्यामुळे दोन्ही पंप बंद पडले आणि सोमवारी सकाळपासून शहराला होणारा पाणी पुरवठा थांबला. सोमवारी दुपारी नगरपंचायतीने शहरात वाहन फिरवून तांत्रिक कारणांमुळे आज पाणी पुरवठा होणार नाही असे नागरिकांना कळवले. No water to Guhagar city Today

गुहागर  शहरात सध्या पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे यामुळे  लॉज व हॉटेल हाऊसफुल आहेत. शिवाय उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी अनेक घरातून पाहुणे आलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना नेहमीपेक्षा जास्त पाणी लागते. त्यामुळे सर्वांना पाण्याचा राखीव साठाही सध्या वापरावा लागत आहे. अशी स्थिती असताना सोमवारी पाणी न आल्याने शहरवासीयांबरोबरच पर्यटन व्यावसायिकांचीही तारांबळ उडाली. No water to Guhagar city Today

पाण्यासाठी युध्दपातळीवर काम सुरू

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरीत पाणी यावे यासाठी सोमवारी दिवसभर गुहागर नगरपंचायत प्रशासकीय कर्मचारी जनार्दन साटले, सुनील नवजेकर, पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी केतन ठोंबरे, अशोक तांबे, रवींद्र जोशी, राजेंद्र पाटील, रीयाझ झोंबडकर, स्वच्छता विभागातील कर्मचारी मनोज घाडे,  आशिष सांगळे, प्रतिक चव्हाण, नीलेश मोहिते, अभिजित मोरे, विजय घाणेकर, आशिष मोहिते, कांतिदिप सावंत, जगन्नाथ घोरपडे, राजेंद्र परकर, सुर्यकांत कदम, विकेश जाधव हे सर्वजण युध्दपातळीवर काम करत आहेत. धरणातील पाण्याची पातळी लक्षात घेवून त्या पातळीपासून विहीरीपर्यंत खोल चर काढण्याचे काम जेसीबीच्या साह्याने सोमवारी दुपारी सुरु करण्यात आले. सोमवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास हे पूर्ण झाले आहे. सध्या चर खणल्यामुळे विहीरीत गढुळ पाणी आले आहे. हे उपसण्याचे काम सुरु आहे. दरम्यान योग्य त्या प्रमाणात विहीरीत पाणी साठले नाही तर तोपर्यंत स्वतंत्र पंपाद्वारे धरणातील पाण्याचा उपसा करण्याची तयारीही नगरपंचायतीने ठेवली आहे. रात्रीपासून विहीरीतील पाणी साठवण टाक्यांमध्ये सोडण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवारी पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी आशा जर्नादन साटले आणि सुनील नवजेकर यांनी व्यक्त केली. No water to Guhagar city Today

माजी नगरसेवक समीर घाणेकर कार्यरत

गुहागर नगरपंचायतीमधील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ एप्रिल अखेर संपला. मात्र माजी नगरसेवक समीर घाणेकर सकाळपासूनच पाण्यासंदर्भातील माहिती घेत होते. नगरपंचायतीची जाहीर सूचना फिरण्यापूर्वीच त्यांनी जनतेला कदाचित आज पाणी येणार नाही असा संदेश सामाजिक माध्यमांमधुन दिला. तसेच धरण आणि विहीरच्या ठिकाणी जावून प्रत्यक्ष कामाची पहाणी केली. नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली. No water to Guhagar city Today

आजच्या स्थितीविषयी गुहागर न्यूजजवळ बोलताना माजी नगरसेवक समीर घाणेकर म्हणाले की, मोडकाआगर धरणातील पाणी उपसा आता वाढला आहे. असगोली, गुहागर, वरवेली, पाटपन्हाळे, पालशेत या ग्रामपंचायती देखील पाणी पुरवठ्यासाठी मोडकाआगरच्या धरणातील पाणी वापरतात. धोपावेसाठी देखील विहीर बांधण्याचे काम सुरु आहे. दरवर्षी मे महिन्यात गुहागर शहराला सर्वाधिक पाणी उपसा करावा लागतो. मे अखेर धरणातील पाण्याची पातळी खाली गेल्यावर पाणी अपुरे पडते. अशावेळी चर खणून धरणातील पाणी विहीरीपर्यत आणण्याचे काम नेहमीच करावे लागते. आमच्या कार्यकाळातही अशी स्थिती होती. लोकप्रतिनिधी कार्यरत असले की, अशी कामे आधी केली जातात. प्रशासनाकडे कारभार गेल्यानंतर स्वाभाविकपणे छोट्या पण महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष होऊ शकते. त्यातच आपल्या नगरपंचायतीला पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी नाहीत. सहाय्यक अधिकारी पेढांबकर अनुभवी होते त्यांची बदली झाली.  स्थानिक कर्मचाऱ्यांकडे अधिकार नसतात. एखादी गोष्ट स्थानिक कर्मचाऱ्यांनी सांगितली तर त्यांचे महत्त्व पटून त्यावर अपेक्षित कार्यवाही होण्यास वेळ लागतो. असे घाणेकर यांनी सांगितले. No water to Guhagar city Today

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share262SendTweet164
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.