रत्नागिरी, ता. 24 : जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू असल्याने माहे फेब्रुवारी 2026 मधील 2 फेब्रुवारी रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन होणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे उपजिल्हाधिकारी (सा. प्र) विश्वजीत गाताडे यांनी कळविले आहे. No Democracy Day due to code of conduct

जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. माहे फेब्रुवारी – २०२६ चा लोकशाही दिन दि. 2 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दु. १ ते २ या वेळेत होणार होता. तथापी सद्यस्थितीत राज्य निवडणूक आयोगाकडील पत्र क्र. रानिआ/जिपपंस २०२५/प्र. क्र. ४८/का.७, दिनांक १३.०१.२०२६ अन्वये राज्यातील १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-२०२६ घोषीत करण्यात आलेला आहे.त्यानुषंगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दि. १३ जानेवारी २०२६ पासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत जिल्ह्यामध्ये आचार संहिता लागू असल्याने माहे फेब्रुवारी २०२६ मधील दि. 2 फेब्रुवारी रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन होणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी. No Democracy Day due to code of conduct
