नियोजन समितीच्या पटलावर ठेवले गुहागरच्या विकासाचे मुद्दे
Guhagar News, ता. 31 : जिल्हा नियोजन समितीच्या (District Planning Commision) सदस्यपदाच्या पहिल्यांदाच मिळालेल्या संधीचा चांगला उपयोग नीलेश सुर्वे (Nilesh Surve) यांनी केला. पदार्पणाच्या सभेत नियोजन समितीच्या सभेसमोर गुहागर तालुक्यासाठी बारमाही सुरक्षित बंदर, कांदळवनांची चुकीची नोंद, ऐतिहासीक स्थळांचा विकास असे विविध मुद्दे मांडले. नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री उदय सामंत यांनी नीलेश सुर्वेंचे कौतुक केले. Nilesh Surve’s impressive Speech in DPC
राज्यातील सत्तांतरानंतर गुहागर तालुका भाजपचे अध्यक्ष नीलेश सुर्वे यांना जिल्हा नियोजन समितीचे सदस्य होण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करण्यासाठी गेले काही दिवस ते मेहनत घेत होते. सोमवार, 31 जुलैला जिल्हा नियोजन समितीची सभा रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालय अल्पबचत भवन येथे झाली. या सभेपूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांनी नव्याने प्रथमच जिल्हा नियोजन समितीच्या सभेला आलेल्या 13 सदस्यांना बैठकीची रूपरेषा आणि कामकाजाची माहिती देत प्रत्येकाला बोलण्याची संधी मिळणार असल्याचे सांगितले. पदार्पणाच्या सभेमध्ये बोलण्याची संधी मिळाल्यावर नीलेश सुर्वे यांनी विविध विषयांची मांडणी केली. Nilesh Surve’s impressive Speech in DPC
Nilesh Surve’s impressive Speech in DPC
तवसाळला मच्छीमार जेटी
गुहागर तालुक्यात मच्छीमारांसाठी बारमाही वापरायोग्य सुरक्षित, व्यापारासाठी आवश्यक सुविधांनी सुसज्ज अशी जेटी नाही. वादळी परिस्थितीत गुजरात, गोवा, केरळ, कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील अनेक ठिकाणच्या बोटी या जयगड खाडीमध्ये सुरक्षिततेसाठी आश्रयाला येतात. यावेळी त्यांच्या मालाची विक्री होण्याकरता आणि वाहतुक होण्याकरता तालुक्यामध्ये सुसज्ज जेटी नसल्यामुळे मच्छीमारांना फार मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत तवसाळ खुर्द गावी मच्छीमार जेटी उभारली गेल्यास तालुक्यातील मच्छीमारांबरोबरच अन्य मासेमारी नौका येथे येतील. त्यामुळे मच्छीमारांचा फायदा होईल. शिवाय स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. याकरिता तवसाळ येथे सुसज्ज अशी मच्छीमार जेटी उभारण्यात यावी. मागणी करण्यात आली.
मायनाक भंडारी व गोपाळकृष्ण गोखलेंचे स्मारक
9 मे, 1866 ला गुहागर तालुक्यातील कोतळूक येथे जन्म झालेले स्वातंत्र्यसेनानी गोपाळकृष्ण गोखले (GopalKrishna Gokhale) हे भारतामधील ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणाऱ्या राजकीय व सामाजिक नेत्यांपैकी एक होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आघाडीचे नेते व भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक होते. 1902 केंद्रीय मध्यवर्ती कायदेमंडळावर त्यांची निवड झाल्याने त्यांना नामदार गोपाळकृष्ण गोखले म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या कार्याची माहिती सर्वांपर्यंत पोचण्यासाठी देशाच्या स्वातंत्र्य महोत्सवाचे अमृतवर्षात कोतळूक येथे त्यांचे स्मारक उभारावे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील सुभेदार, खांदेरी उंदेरी किल्ल्याच्या संरक्षणाची मोहिम फत्ते करणारे आणि सुवर्णदुर्ग किल्ला जिंकून देणारे मायनाक भंडारी (Maynak Bhandari) हे रत्नागिरी जिल्ह्यातील भाटे गावचे आहेत. त्यामुळे भंडारी समाजातील शूर वीर मायनाक भंडारी यांचे स्मारक उभे रहावे. आमदार प्रसाद लाड यांनी मंडणगड ते राजापूर या दरम्यानच्या मार्गावर स्वातंत्र्य सैनिक व हुतात्मा यांच्या स्मृती जागविण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी पुतळे बसविण्याची मागणी केली आहे. या यादीतही मायनाक भंडारी यांच्या नावाचा समावेश व्हावा. Nilesh Surve’s impressive Speech in DPC
गडाचे सुशोभिकरणाने पर्यटन वाढेल
गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे असलेला गोपाळगड आणि तवसाळमधील विजयगड हे शासनाने ताब्यात घेण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. या दोन्ही गडांचे संवर्धन व सुशोभीकरण करावे. त्यामुळे गुहागर तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांना येथील इतिहासाची माहिती मिळेल. त्यातून पर्यटनात वाढ होईल. शिवाय स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होइल.
Nilesh Surve’s impressive Speech in DPC
गुहागर तालुक्यातील तवसाळ खुर्द येथील सुरुंच्या झाडाची लागवड असणारे क्षेत्र हे चुकीच्या पद्धतीने कांदळ वनाच्या नावे सातबारा सदरी नोंदवल्या असल्याचे नीलेश सुर्वे यांनी पालकमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले. Nilesh Surve’s impressive Speech in DPC
गुहागर तालुक्यामध्ये पडवे आणि सडे जांभारी या दोन महसूल गावात २५ वर्षांपूर्वी बांधलेल्या कृषी विभागाच्या इमारती आजपर्यंत वापराविना पडीकच आहेत. त्यापैकी पडवेची इमारत पडवे विविध कार्यकारी सोसायटीच्या कार्यालयास मिळावी. अंजनवेल येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेला विजपुरवठ्याकरता ट्रांसफार्मरची नितांत गरज असून तो ट्रान्सफार्मर तातडीने बसविण्यात यावा. अशा मागण्याही गुहागरचे भाजप तालुकाध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे निमंत्रीत सदस्य नीलेश सुर्वे यांनी केल्या. Nilesh Surve’s impressive Speech in DPC
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी जलजीवन मिशन योजनांचा आढावा घेतला. या आढाव्यातही जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनांच्या कार्यवाहीतील त्रुटी नीलेश सुर्वे यांनी सांगितल्या. Nilesh Surve’s impressive Speech in DPC
पहिल्याच जिल्हा नियोजन समितीमध्ये अनेक विषयांची मुद्देसुद मांडणी केल्याने नीलेश सुर्वे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष, पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील त्यांचे कौतुक केले आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आमदार भास्कर जाधव, प्रसाद लाड, राजन साळवी, शेखर निकम, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदी अधिकारी, जिल्हा नियोजन समितीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
संबंधित बातम्या
संघर्षरत कार्यकर्त्याचा सन्मान : नीलेश सुर्वे यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड
भाजप तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांची पर्यटनमंत्र्यांकडे मागणी