भैरी व्याघ्रांबरी संघाचे आयोजन; विधाता असगोली संघ उपविजेता
गुहागर, ता. 23 : श्री भैरी व्याघ्रांबरी क्रिकेट संघ गुरववाडी गुहागर आयोजित व शिवसेना युवासेना गुहागर शहर पुरस्कृत एक दिवसीय नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे (Night Underarm Cricket Competition) विजेतेपद झोलाई, पालशेत संघाने पटकावले. तर विधाता असगोली संघ उपविजेता ठरला.


रविवार, 22 मे रोजी नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन युवासेना शहर प्रमुख राकेश साखरकर आणि गुरववाडी शाखाप्रमुख श्री दिलीप गुरव यांनी केले. स्पर्धेमधील विजेत्या झोलाई पालशेत संघाला रोख रुपये 7001 आणि चषक देवून गौरविण्यात आले. तर उपविजेता विधाता असगोली संघाला रोख रुपये 5001 आणि चषक देवून गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून कुंदन रोहीलकर, उत्कृष्ट फलंदाज, अंतिम सामन्यातील सामनावीर व मालिकावीर म्हणून आदित्य झगडे यांची निवड करण्यात आली. या खेळाडूंना चषक देवून गौरविण्यात आले. Night Underarm Cricket Competition


स्पर्धेकरिता प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रोख रुपये 7001/- शिवसेना शहर प्रमुख श्री निलेश मोरे यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आले होते. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रोख रुपये 5001/- कु. मायरा पोळेकर यांनी पुरस्कृत केले होते. तसेच प्रथम व द्वितीय क्रमांकाचे चषक सौ मनीषा मंगेश कदम यांच्या सौजन्याने देण्यात आले. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर आणि अंतिम सामन्यातील सामनावीर यांच्यासाठीचे चषक युवासेना तालुका प्रमुख अमरदीप परचुरे यांनी पुरस्कृत केले होते. संपूर्ण स्पर्धेकरिता विनायक बारटक्के, प्रवीण रहाटे, वीरेंद्र साळवी यांनी चेंडूंची उपलब्धता करुन दिली. Night Underarm Cricket Competition


स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कल्पेश बागकर यांच्या नेतृत्वाखाली अविनाश सांडीम, अभिषेक कदम, प्रसाद गुरव, मयुरेश बागकर, राकेश बोले, मया घाडे, सुधन गुरव, वेदांत कदम, प्रथमेश कदम, आशिष कदम, दिलीप गुरव, पप्प्या रहाटे, वैभव झिंबर, विनोद कदम, महेश घाडगे यांनी मेहनत घेतली. संपूर्ण स्पर्धेत श्री. अरुण भागडे यांनी समालोचन केले. Night Underarm Cricket Competition