श्री संताजी संग्राम क्रिकेट संघ तेलीआळी आयोजित
गुहागर, ता. 07 : येथील श्री संताजी संग्राम क्रिकेट संघ तेलीआळी आयोजित दि. 7 व 8 फेब्रुवारी रोजी नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेला आज मोठ्या दिमाखात प्रारंभ होणार आहे. या स्पर्धा कै. विठ्ठल रहाटे क्रीडानगरी, श्री संताजी जगनाडे मंदिर तेलीआळी येथे खेळविण्यात येणार आहेत. Night cricket tournament in Guhagar

या स्पर्धेतील विजेत्या संघाला 10 हजार 111/- व चषक तर उपविजेत्या संघास 5 हजार 555/- व चषक देवून गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील फलंदाज, गोलंदाज, सामनावीर, मालिकावीर यांची निवड केली जाणार आहे. या स्पर्धेचा आनंद समस्त क्रीडा रसिकांनी लुटावा, असे आवाहन करण्यात आले आहे. Night cricket tournament in Guhagar
