गुहागर, ता. 15 : तालुक्यातील खोडदे गावचे सुपुत्र आणि आबलोली बाजार पेठेतील वृत्तपत्र विक्रेते शंकर गंगाराम साळवी यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने बुधवार दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे दुःखद निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 54 वर्ष होते. Newspaper seller Shankar Salvi

त्यांच्या पाश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व सहा भाऊ, भावजय, बहीण असा मोठा परिवार आहे. वृत्तपत्र विक्रेते शंकर साळवी यांच्या निधनाने आबलोली – खोडदे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. Newspaper seller Shankar Salvi