माघी गणेशोत्सवासाठी गुहागरातून मुंबईत मुर्ती रवाना
गुहागर, ता. 30 : माघ महिन्यातील शुध्द चतुर्थीला म्हणजेच विनायकी चतुर्थीला गणेशमुर्तींची स्थापना करण्याचा नवा ट्रेंड सध्या पसरत आहे. मुंबईतील एका गणेश भक्ताने या उत्सवासाठी शाडु मातीची मूर्ती गुहागरातून नेली आहे. पूर्णपणे हाती बनवलेल्या या मुर्तीच्या सौंदर्याची प्रशंसा यानिमित्ताने गुहागकरांनी केली. (New Trend of Ganesh Festival)

भाद्रपद महिन्यातील शुध्द चतुर्थीला घरोघरी गणेशमुर्तींची स्थापना केली जाते. पुढे दिड दिवस, गौरी गणपती विसर्जन, वामन द्वादशी, अनंत चतुदर्शी या दिवशी गणेशमुर्तींचे विसर्जन होते. परंतू अतिवृष्टी, महापूर, अशा बदललेल्या निसर्ग चक्रामुळे अनेकांना भाद्रपदात गणेशमुर्ती घरी आणता आल्या नाहीत. माघ शु. चतुर्थीला गणेशाचा जन्मोत्सव अनेक ठिकाणी साजरा केला जातो. (New Trend of Ganesh Festival)
हाच धागा पकडून काहीजणांनी माघ महिन्यातील चतुर्थीला गणेशमुर्ती घरी आणण्यास सुरुवात केली आहे. परंतु यामध्ये अडचण असते ती गणेशमुर्तींची. मुंबईमध्ये सहजपणे माघ महिन्यात गणेशमुर्ती मिळत नाहीत. त्यावर पर्याय म्हणून बोरीवलीच्या सहस्रबुध्दे कुटुंबाने थेट गुहागरातील मुर्तीकार संदीप बारटक्के यांच्याकडे गणेश मुर्तीची मागणी केली. (New Trend of Ganesh Festival)
सध्या मुर्तींकामाची गडबड नसल्याने संदीप बारटक्के यांनी शाडु मातीमध्ये हाती मुर्ती बनवली. पीओपी, रबरी संचातून काढण्यात येणाऱ्या मुर्तीपेक्षाही ही मुर्ती इतकी सुंदर, आखिव रेखीव झाली की त्याची चर्चा गुहागरमध्ये सुरु झाली. रविवारी ही मुर्ती मुंबईला रवाना झाली. (New Trend of Ganesh Festival)
याबाबत बोरीवलीचे सहस्रबुध्दे म्हणाले की, अतीपावसामुळे आम्ही माघात अडीच दिवस गणपती आणण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेतला. त्यामुळे आमच्या सहा सात कुटुंबांना मुंबईत एकत्र येणेही सहजशक्य होते. गणपतीबाप्पाची सेवा समाधानाने करता येते. आमच्यानंतर आणखी काही मंडळींनीही असाच निर्णय घेतला आहे. (New Trend of Ganesh Festival)
