उपमुख्यमंत्री ना. शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश
गुहागर, ता. 28 : वेळणेश्वर गटामध्ये एकतर्फी दबदबा ठेवणाऱ्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सौ नेत्रा नवनीत ठाकूर आणि पडवे जि. प. गटाचे सदस्य महेश नाटेकर यांच्यासह पंचायत समिती माजी सभापती, विद्यमान सरपंच आणि माजी सरपंच, उबाटा पक्षाचे विभाग प्रमुख व सुमारे सहा हजार कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उधोग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना ना. शिंदे म्हणाले, जो आज तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला, त्या विश्वासाला कधी तडा जाऊं देणारं नाही. या भागाच्या विकासाची जबाबदारी ही आमची राहिलं, अशी ग्वाही त्यांनी दिली. Netra Thakur, Mahesh Natekar join party

हेदवतड येथील मच्छीमार समाजाचा सभागृहामध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. या पक्षप्रवेशाने गुहागर तालुक्यात उबाटाच्या शिवसेनेला मोठा दणका बसला आहे. यावेळी मंत्री भरत गोगावले, माजी आमदार संजय कदम, जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, माजी सभापती राजेश बेंडल, विलास वाघे, दत्ताराम निकम, विपुल कदम, बापू म्हाप, रामचंद्र हुमणे, पांडुरंग पाते, तुकाराम निवाते, गुहागर तालुकाध्यक्ष दीपक कनगुटकर, प्रदीप सुर्वे, हयात खले, निलेश मोरे, अमरदीप परचुरे, अमोल गोयथळे, रोहन भोसले आदी उपस्थित होते. Netra Thakur, Mahesh Natekar join party

उद्योग मंत्री उदय सामंत आजचा हा पक्ष प्रवेश जिल्ह्यातील राजकारणाला खऱ्या अर्थाने कळाटणी देणारं आहे. ज्या भावाने तुमच्यावर सख्या भावापेक्षा जास्त प्रेम केले, त्या भावाला भेटण्यासाठी दुपारी 3 वाजल्यापासून तुमच्या लाडक्या बहिणी याठिकाणी थांबून आहेत. येणारी पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद वं नगरपंचायत निवडणूक असेल, या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भगवा फडकवायचा आहे, असा शब्द देऊया. तुमच्या समस्या या माझ्या समस्या समजून येणाऱ्या काळात त्या मार्गी लावू, असा शब्द यनिमित्ताने देतो, असे ना. सामंत यांनी सांगितले. Netra Thakur, Mahesh Natekar join party
