गुहागर, ता. 30 : वेळणेश्वर जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक जाहीर होताच एकच नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या नेत्रा ठाकूर यांनी तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरताच संपूर्ण गटाचं राजकारण ढवळून काढलं आहे. या आधी दोन वेळा थेट जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या नेत्रा ठाकूर या केवळ उमेदवार नाहीत, तर विकासाची ओळख बनल्या आहेत. Netra Thakur in the field for the third time
रस्ते असोत, पाणीपुरवठा असो, आरोग्य सुविधा असोत वा शिक्षणाचा प्रश्न कामाच्या प्रत्येक आघाडीवर त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. विशेष म्हणजे जिल्हा नियोजन समितीवर काम केलेला अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे केवळ मागण्या मांडणं नाही, तर त्या प्रत्यक्ष मंजुरीपर्यंत नेण्याची क्षमता नेत्रा ठाकूर यांच्याकडे आहे, हे वेळणेश्वरच्या गटाच्या जनतेनं यापूर्वी अनुभवलं आहे. Netra Thakur in the field for the third time

आज अनेक चेहरे नव्यानं मैदानात असले तरी, कामाचा हिशोब मागितला की नाव एकच पुढे येतं – नेत्रा ठाकूर. त्यामुळेच त्यांच्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या गोटात अस्वस्थता वाढली असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे. “आम्ही बोलत नाही, आम्ही करून दाखवतो” हीच नेत्रा ठाकूर यांची ओळख असून, अनुभव, काम आणि विश्वासाच्या जोरावर त्या पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने वाटचाल करतील, असा ठाम विश्वास वेळणेश्वर गटातील नागरिक व्यक्त करत आहेत. Netra Thakur in the field for the third time
