नीता मालप; नवनिर्वाचित नगराध्यक्ष पदभार स्वीकारला
गुहागर, ता. 29 : माझ्यावर जो जनतेने विश्वास दाखविला आहे तो मी पूर्ण करेन सगळ्यांनाच विश्वासात घेऊन गुहागर नगरीचा विकास करणार असून गुहागर नगरीचा विकास हा एकच ध्यास समोर ठेवून मी काम करणार असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित नगराध्यक्ष नीता मालप यांनी पदभार स्वीकारताना व्यक्त केले. Neeta Malap takes charge as Mayor
नवनिर्वाचित नगराध्यक्ष पदभार कार्यक्रम गुहागर नगरपंचायत हॉलमध्ये पार पडला त्यावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम गुहागर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. नवनिर्वाचित नगराध्यक्ष नीता मालप पुढे म्हणाल्या की, येथे येतेवेळी पक्षाचे झेंडे सर्वांनीच बाजूला ठेवावे आपण येथे फक्त गुहागर नगरीचा विकास करण्यासाठी आलेले आहोत. आपल्याला काम करायची आहेत उत्कृष्ट दर्जाची. सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने चांगले काम करून आदर्श निर्माण करूया असे शेवटी त्या म्हणाल्या. Neeta Malap takes charge as Mayor
यावेळी माजी आमदार विनय नातू म्हणाले की, एक चांगले आदर्शवत नगरपंचायत बनवूया त्यासाठी सर्वांनीच चांगले प्रयत्न करावे. या राज्यात सत्ता महायुतीची असून विकास निधी कधीच कमी पडणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केले. तर राजेश बेंडल यांनी निवडणुकीपूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर सभेत सर्वतोपरी मदत सर्वांगीण विकास साठी मदत करण्याचा शब्द दिला होता. त्याप्रमाणे आजही दूरध्वनीवरून नूतन नगराध्यक्षांचे अभिनंदन करून गुहागर नगरीच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची आश्वासन दिले असल्याचे सांगितले. Neeta Malap takes charge as Mayor
या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, शिंदे सेना तालुकाध्यक्ष दीपक कनगुटकर, भाजपा जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, गुहागर तालुका भाजपा अध्यक्ष अभय भाटकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस निलेश सुर्वे, भाजपा तालुका सरचिटणीस सचिन ओक ,संतोष सांगळे, प्रांजली कचरेकर नवनिर्वाचित नगरसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. Neeta Malap takes charge as Mayor
