गुहागर, ता. 08 : तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती साठी इच्छुक असणार्या उमेदवारांना घेऊन भेटी-गाठी आणि खासदार सुनील तटकरे यांच्या निधीतून मंजूर झालेल्या विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाचा धडाका सुरू झाला आहे. NCP starts building fronts
खासदार सुनील तटकरे साहेबांच्या निधीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव आणि अजय बिरवटकर यांच्या कडे पाठपुरावा करून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री.साहिल आरेकर यांनी गुहागर तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे मंजूर करून आणली आहे. याच विकासकांची भूमिपूजन कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस कडून होत असून राष्ट्रवादी काँग्रेस कडून जि.प, पं.स, निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुहागर तालुक्यातील विविध भागात भूमिपूजन समारंभ पार पडले आहेत. यामध्ये तळवली, पेवे, कुडली, कारुळ, पाभरे, कोतळूक, आरेगाव, अश्या विविध भागातील विविध जिल्हा परिषद गटातील कामांचा समावेश आहे. NCP starts building fronts

राष्ट्रवादी काँग्रेस महायुती म्हणुन लढणार, की पुन्हा एकदा नगरपंचायत प्रमाणे स्वबळावर निवडणूक लढविणार की, अन्य कोणती आघाडी करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. परंतु विकासकामांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुक्यात जोरदार धडाका गेल्या काही दिवसांपासून आपण पाहत आहोत. NCP starts building fronts
