गेल्या २० वर्षांत ७०० हून अधिक नक्षल्यांनी केले आत्मसमर्पण
गुहागर न्यूज : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादविरोधी कारवाईने मोठा टप्पा गाठला आहे. नक्षलवादाचा म्होरक्या मल्लोजुला वेणुगोपाल याने 60 नक्षलवाद्यांसोबत आत्मसमर्पण केलं आहे. मल्लोजुला वेणुगोपाल हा भूपती किंवा सोनू या नावानेही ओळखला जातो. भूपती हा माओवादी संघटनेचा एक मोठा चतुर रणनितीकार होता. बऱ्याच काळापासून तो महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर नक्षलवादी अभियानांकडे लक्ष देत होता. Naxalite leader Bhupathi surrenders
गेल्या काही महिन्यांपासून भूपती आणि नक्षलवादी संघटनाच्या मोठ्या नेत्यांमध्ये वाद सुरू होता. त्यामुळे संघटनेतच संघर्ष पेटला होता. भूपतीचं म्हणणं होतं की, हत्यारांच्या जोरावर लढ्याला यश मिळत नाहीये. याशिवाय लोकांचं समर्थन कमी होत आहे. आतापर्यंत शेकडो नक्षलवादी मारले गेले आहेत. त्यामुळे त्याने शांतता आणि चर्चेचा मार्ग निवडण्याची विनंती केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भूपतीच्या या मतांचा संघटनेच्या इतर नक्षलवाद्यांनी विरोध केला. त्यामुळे बराच काळ संघटनेतील नेत्यांमध्ये लढा सुरू होता. मात्र नक्षलवादांच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या दबावामुळे भूपतीने शस्त्र त्यागण्याचा निर्णय घेतला. या वर्षाच्या सुरुवातीला भूपतीची पत्नी तारकानेही आत्मसमर्पण केलं होतं. ती प्रतिबंधित आंदोलनाच्या दंडकारण्य विशेष क्षेत्रीय समितीची सदस्य होती. Naxalite leader Bhupathi surrenders
भूपतीवर दहा कोटींपेक्षा जास्त बक्षीस
गेली चाळीस वर्षे माओवादी संघटनेच्या विस्तारासाठी सक्रिय असलेला केंद्रीय समिती आणि पोलिट ब्युरो सदस्य भूपतीनं आत्मसमर्पण केलं आहे. नक्षलवादी नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू याच्यावर विविध राज्यांमध्ये मिळून दहा कोटींपेक्षाही जास्त बक्षीस घोषित करण्यात आलं होतं. भूपती हा माओवादी पक्षाच्या पॉलिट ब्युरो आणि केंद्रीय समितीचा सदस्य होता. 69 वर्षांचा भूपती बीकॉम आहे. नक्षलवादी चळवळीतला जहाल नेता, अशी त्याची ओळख. तो महाराष्ट्र–छत्तीसगड सीमावर्ती माड डिव्हिजनमध्ये सक्रिय होता. गेल्या 40 वर्षांपासून तो संघटनेत कार्यरत होता. गडचिरोलीसह छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा आणि आंध्र प्रदेश अशा राज्यांची जबाबदारी त्याच्याकडे होती.

भूपती हा नक्षली कट आखायचा. तो अनेक वर्षे महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेवरचा प्लाटूनचा मार्गदर्शक म्हणून कार्यरत होता. भूपतीने ‘सशस्त्र संघर्ष’ निष्फळ ठरल्याचे मान्य करून, शस्त्रसंधीचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन माओवादी सहकाऱ्यांना केलं होतं. “माओवाद्यांचा जनाधार घटला आहे, शेकडो सहकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे; त्यामुळे संघर्ष नव्हे, तर संवादच पर्याय आहे,” असे त्याने एका पत्रकात म्हटलं होतं. त्याच्या या भूमिकेला काही नक्षल नेत्यांनी विरोध केला. महासचिव थिप्पारी तिरुपती उर्फ देवजी यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरू ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र, केंद्रीय समितीने भूपतीवर दबाव आणत शस्त्र खाली ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्याने संघटनेतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आणि अखेर साठ सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. भूपती शरण येताच गडचिरोली जिल्ह्यातला नक्षलवाद जवळपास संपुष्टात आलाय. “एकतर माओवाद्यांनी शरण यावं, अन्यथा त्यांना कंठस्नान घालू,” असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता. Naxalite leader Bhupathi surrenders

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “भूपती यांची आदिवासी तरुणांच्या व्यर्थ मिशनसाठी आणि सुरक्षा दलांशी निरर्थक संघर्षात जीव गमावण्याबद्दलची चिंता अनेक नक्षलवादी कैद्यांमध्ये आहे. याशिवाय, ते मुख्य प्रवाहात सामील झालेल्या नक्षलवाद्यांना मिळणारे फायदे पाहत आहेत. आता, सशस्त्र क्रांती सुरू ठेवण्यापेक्षा आत्मसमर्पण करणे त्यांना अधिक योग्य वाटते. त्यामुळे, आम्ही आत्मसमर्पणाची लाट अपेक्षित करत आहोत.” भूपती, ज्यांना सोनू म्हणूनही ओळखले जाते, ते प्रतिबंधित कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) चे एक प्रमुख सदस्य होते. त्यांनी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर ऑपरेशन्सचे नेतृत्व केले होते आणि त्यांच्यावर ६ कोटी रुपयांचे बक्षीस होते. पोलिसांनी सांगितले की, भूपतींचा नक्षलवादी कैद्यांमध्ये मोठा प्रभाव आहे. तज्ञ भाकीत करतात की, ते इतर नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी प्रेरित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “बरेच जण त्यांच्याकडे आदराने पाहतात. त्यांच्या आत्मसमर्पणामुळे कमांड चेन तुटते.” बुधवारी, भूपती यांनी ६० अनुयायांसह गडचिरोली जिल्ह्यात आत्मसमर्पण केले. त्यांनी ५४ बंदुका, ज्यात सात AK-47 आणि नऊ INSAS रायफल्सचा समावेश होता, त्या जमा केल्या. या गटात मध्यवर्ती समितीचे एक सदस्य आणि विभागीय समितीचे १० सदस्य यांसारखे वरिष्ठ सदस्य होते. Naxalite leader Bhupathi surrenders
भारतातील नक्षलवादी चळवळीचा प्रवास
तेलंगणात 1946 ला झालेल्या सशस्त्र उठावाच्या दोन दशकानंतर 1967 साली उत्तर बंगालमधील नक्षलबारी शहरात जमीनदार वर्गाविरुद्ध शेतकऱ्यांनी केलेल्या उठावातून माओवादी विचारसरणीने भारतात आकार घेतला. सत्तरच्या दशकात हा उठाव बंगाल, बिहार, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि झारखंड या राज्यांमध्ये पसरला. हा काळ या चळवळीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. 2004 मध्ये आणखी एक महत्त्वाची घटना घडली. त्यावेळी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी-लेनिनवादी) पीपल्स वॉर ज्याला पीडब्ल्यूजी म्हणून ओळखलं जातं, आणि माओवादी कम्युनिस्ट सेंटर ऑफ इंडिया (एमसीसीआय) या दोन संघटनांच्या विलीनीकरणातून कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या पक्षाची स्थापना करण्यात आली. Naxalite leader Bhupathi surrenders
छत्तीसगड हे नक्षलवादी कारवायांचं प्रमुख केंद्र राहिलं आहे. या राज्यातल्या बस्तर भागातून मोठ्या प्रमाणात नक्षलवादी कारवाया करण्यात आल्या आहेत. बस्तर हा भाग केरळ राज्याएवढा मोठा आहे. नक्षलवाद्यांचा शेवटचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बस्तरच्या आत शिरून बसवराजूला ठार केल्यामुळं आता हेही ठिकाणी नक्षलवाद्यांसाठी सुरक्षित राहिलं नसल्याचं स्पष्ट झालं आहे. बस्तरची सुरक्षा भेदली गेल्यामुळं आता सीपीआय माओवादी या बंदी असलेल्या पक्षाचा शेवट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हैदराबाद इथं राहणाऱ्या सामाजिक शास्त्रज्ञ आणि पत्रकार एन वेणुगोपाल यांना असं वाटतं की, कदाचित ही चळवळ अजूनही संपलेली नाही. नक्षलवादी चळवळीवर डझनभर पुस्तकं लिहिलेल्या एन वेणुगोपाल यांचं असं म्हणणं आहे की, “बसवराजूच्या मृत्यूनंतर नक्कीच ही चळवळ संथ होईल. पण सत्तरच्या दशकातही चळवळीच्या सरचिटणिसांचे मृत्यू झाल्यानंतर मार्क्सवादी-लेनिनवादी चळवळीने स्वतःला सावरलं आहे. वेणुगोपाल यांचा युक्तिवाद असा होता की, गेल्या काही वर्षांत नक्षलवाद्यांनी दलित आणि आदिवासी समुदायांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आहे. जातीच्या आधारे होणाऱ्या अत्याचाराला विरोध केला आहे आणि गरिबांमध्ये जमिनीचे वाटप सुनिश्चित केले आहे. Naxalite leader Bhupathi surrenders
सत्तरच्या दशकात नक्षलवाद्यांनी रॅडिकल स्टुडंट्स युनियन (आरएसयू) या नावाने विद्यार्थ्यांची संघटना स्थापन केली होती. या संघटनेचे एक माजी नेतेही वेणुगोपाल यांच्या मताशी सहमत आहेत. ऐंशीच्या दशकाच्या मध्यावर तेलंगणातील नक्षलवादी चळवळीचा बिमोड करण्यासाठी दुहेरी पातळीवर प्रयत्न केले गेले. एका बाजूला सुरक्षा दलांच्या कारवाया वाढवण्यात आल्या, त्या अधिक कठोर केल्या गेल्या आणि दुसऱ्या बाजूला सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना लागू केल्या. तेलंगणातील एका निवृत्त अधिकाऱ्याने 2016 मध्ये आमच्या प्रतिनिधीला सांगितलं होतं की, “इतर गोष्टींबरोबरच आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनाच्या योजनेने खूप मदत केली.” Naxalite leader Bhupathi surrenders
