गुहागर, ता. 03 : मधील श्री वराती देवी मंडळातर्फे 28 ते 2 ऑक्टोबर दरम्यान श्री वराती देवी च्या शारदीय नवरात्र निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान महिलांसाठी विशेष आकर्षण म्हणून सोडत पद्धतीने नाव काढून पैठणी साडी ने सन्मान करण्यात आला. Navratri festival of Shri Varati Devi in Guhagar

या नवरात्र उत्सवात वाळकेश्वर नवतरुण प्रासादिक भजन मंडळ साकेडी कणकवलीचे बुवा रुपेश मेस्त्री यांच्या मधुर आवाज प्रेक्षकांना भावला. तर संगमेश्वर येथील गोफ नृत्यातील विविध प्रकारातून ग्रामीण शैलीतील नृत्याला विशेष दाद मिळाली. अंत्राऴ देवी नाच मंडळ कानरकोंड (संगमेश्वर) येथील महिलांनी पारंपारिक गोफ नृत्यातील वेणी, कारल, पाळणा, जाळ व मुसळ आदी विविध प्रकारचे नृत्य ग्रामीण पद्धतीने करत प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली. Navratri festival of Shri Varati Devi in Guhagar

याचबरोबर नवरात्र मधून महिलांना प्राधान्य देत जान्हवी विखारे यांचे माऊली महिला भजन मंडळ (जानवऴे), ईश्वरी डोरलेकर यांचे नवलाई महिला भजन मंडळ (हेदवतड), गुहागर शहरातील गोपाळ कृष्ण भजन मंडळ दुर्गाश्री भजन मंडळ कलावती आई भजन मंडळ, गंगामाता कारूऴ, दत्त प्रसादिक पालशेत जांभळा देवी भजन मंडळ, गुहागर स्थानिक भजने झाली. रानवी येथील वरदान देवी कला नृत्य पथक यांनी जाकडी नृत्य सादर केले. Navratri festival of Shri Varati Devi in Guhagar