हेदवी आणि उमराठची ग्रामदेवता, 350 वर्षांपूर्वीचे देवस्थान
गुहागर, ता. 27 : तालुक्यातील उमराठ- हेदवी या दोन गावांची ग्रामदेवता श्री नवलाई देवी असून या ग्रामदेवतेचे ३५० वर्षां पुर्वीचे जागृत देवस्थान आहे. या ग्रामदेवतेचा उत्सव दोन्ही गावातील ग्रामस्थ, मानकरी, यांनी उत्साहात साजरा केला. Navratri festival of Hedvi Umrath Navalai Devi

श्री नवलाई देवी मंदिरात कोकणातील प्रमुख देव-देवतांची प्रतिस्थापना केली असल्याचे सांगितले जाते. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी अशीही नवलाई देवीची ख्याती आहे. या मंदिरात साधनेला बसणाऱ्या भाविकांना एक वेगळाच आनंद, समाधान मिळत असल्याचे अनेक भक्त सांगतात. ग्रामदेवतेच्या मंदिरातील सर्व सण, उत्सव, पारंपरिक रिवाजाप्रमाणे हेदवी आणि उमराठमधील ग्रामस्थ साजरे करतात. Navratri festival of Hedvi Umrath Navalai Devi

श्री नवलाई देवीचा नवरात्रोत्सवही दोन्ही गावातील पुजारी, मानकरी, गावकरी यांनी एकत्र येवून साजरा केला. दसऱ्या पर्यंत ढोल व घंटानादाच्या स्वरात पुजाअर्चा, भजन, कीर्तन, प्रवचन अशा धार्मिक, अध्यत्मिक कार्यक्रमांबरोबरच दांडियानृत्यचा कार्यक्रमही देवस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. शनिवारी (दि. २१) साखरी आगर गावातील पुर्वापार प्रसिद्ध असलेले गोंधळी कै. महादेव व कै. पंढरीनाथ बिर्जे यांचे वंशज श्री. पल्लवी बिर्जे आणि सहकारी बंधू यांनी सुश्राव्य कथाकथनाने देवीचा गोंधळ घालून भाविकांना प्रबोधन केले. येथील दसऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे सोने लुटल्यानंतर सर्व ग्रामस्थ देवाला सोने ठेवाताना तुम्ही घ्या सोने, मला द्या रुपे अशी प्रार्थना देवाकडे करतात. त्यानंतर एकमेकांना सोने देवून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. Navratri festival of Hedvi Umrath Navalai Devi

घटस्थापनेच्या दिवशी मंदिराच्या गाभाऱ्यात पूर्वांपार असलेल्या लाकडी कुंडात मिश्र कडधान्य पेरले गेले. सुर्यप्रकाश पोचत नसताना, गाभाऱ्यातील मंद समईच्या प्रकाशावर अवघ्या दहा दिवसांत सर्व धान्याची एकसमान वाढ झाली. या रोपांचे दर्शन घेण्यासाठी देखील पंचक्रोशीतील भाविकांनी शेवटचे दोन दिवस श्री नवराई मंदिरात मंडळी हे पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. Navratri festival of Hedvi Umrath Navalai Devi

