श्री स्वयंभू विकास मंडळाचा उपक्रम
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 30 : तालुक्यातील वेळणेश्वर येथील श्री स्वयंभू विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कै. वामन काका जोशी यांचे भव्य पटांगणात दुर्गा देवीचा नवरात्रौत्सव रविवार दि. 28 सप्टेंबर ते शुक्रवार दि. 03 सप्टेंबर 2025 अशा 5 दिवसात विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. तरी भाविकांनी या उत्सवाचा लाभ घ्यावा, असे जाहीर आव्हान श्री. स्वयंभू विकास मंडळ वेळणेश्वर व ग्रामस्थ मंडळ वेळणेश्वर यांनी केले आहे. Navratri festival at Velneshwar
रविवार दिनांक 28 रोजी श्री दुर्गादेवी मातेचे मिरवणुकीने आगमन झाले. सोमवार दिनांक 29 रोजी श्री दुर्गादेवी मातेची प्राणप्रतिष्ठापणा, पूजा व आरती कार्यक्रम संपन्न झाले. आज मंगळवार दि. 30 रोजी रात्रौ 08:30 वाजता श्री. लक्ष्मीनारायण भजन मंडळ हेदवी यांच्या भजनाचा कार्यक्रम संपन्न होईल. त्यानंतर आरती घेण्यात येईल. रात्रौ 09:30 वाजता फणी गेम्स आयोजित करण्यात आलेला आहे. Navratri festival at Velneshwar

बुधवार दि. 01 रोजी सकाळी 07:00 वाजता श्री. दुर्गादेवी मातेची पूजा व आरती कार्यक्रमाचे आयोजन, सायंकाळी 07:00 वाजता गुहागर खालचापाट येथील स्वर साधना भजन मंडळ बुवा आदिती धनावडे यांच्या भजनाचा कार्यक्रम होईल. रात्रौ 08:30 वाजता महाआरती, रात्रौ 09:30 वाजता गुहागर तालुक्यातील शारदादेवी नृत्य कलापथक असगोली वरचीवाडी शक्तीवाले शाहीर श्री. प्रमोद घुमे यांच्या विरुद्ध गुहागर तालुक्यातील मुंढर येथील तुरेवाले शाहीर विनोद गावडे सह दिनेश सुतार यांचा डबलबारी नाचाचा सामना आयोजित करण्यात आलेला आहे. Navratri festival at Velneshwar
गुरुवार दि. 02 रोजी सकाळी 07:00 वाजता श्री. दुर्गादेवी मातेची पूजा, सकाळी 09:00 वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा व आरती, दुपारी 03:00 वाजता माता-भगिनींसाठी हळदीकुंकू कार्यक्रम, रात्रौ 08:30 वाजता महाआरती होणार असून रात्रौ 10:00 दांडिया रास खेळण्यात येणार आहे. यावेळी लहान गटात, मोठ्या गटात खुल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. Navratri festival at Velneshwar
शुक्रवार दिनांक 03 रोजी सकाळी 07:00 वाजता दुर्गादेवी मातेची पूजा त्यानंतर दुपारी 12:00 वाजता महाआरती घेण्यात येणार असून सायंकाळी चार वाजता मिरवणुकीने श्री दुर्गादेवी मातेच्या मुर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे. Navratri festival at Velneshwar
