संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 17 : तालुक्यातील आबलोली येथील श्री.विठ्ठल रखुमाई मंदिराच्या भव्य पटांगणात श्री.दुर्गा देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. सुप्रसिध्द विठ्ठल रखुमाई नवतरुण मित्रमंडळ आबलोली कोष्टेवाडी या मंडळाच्या संयुक्त विद्यमाने मंडळाचे अध्यक्ष श्री.कृष्णकांत रेपाळ, उपाध्यक्ष श्री.रविंद्र रेपाळ, सचिव श्री.अजित रेपाळ, खजिनदार श्री.प्रशांत नेटके यांच्या अधिपत्याखाली नवरात्रोत्सवास प्रारंभकरण्यात आला. Navaratrautsavas begins at Aabloli
आबलोली येथील नवसाला पावणारी दुर्गा देवीची भव्यदिव्य आकर्षक मुर्ती आबलोली येथील व्यापारी लक्ष्मी स्टीलचे मालक कृष्णकुमार सुंदेशा यांनी भेट दिली आहे. गेली १५ वर्ष हे मंडळ नवरात्रोत्सवात सामाजिक उपक्रम राबवितात. यामध्ये गेल्यावर्षी नेत्रदान, नेत्र तपासणी शिबिर, आरोग्य शिबीर, महिलांसाठी व विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा तसेच तालुक्यातील नामांकित महिला मंडळ व पुरुष मंडळी यांचे सुमधुर भजनाचे कार्यक्रम विनामुल्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात येऊन मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात येते. हा संपूर्ण कार्यक्रम भक्ती भावाने व उत्साहात पार पडतो. Navaratrautsavas begins at Aabloli
या मंडळाचे सदस्य श्री.नरेश निमूणकर, प्रथमेश निमूणकर, नितेश (उर्फ भैय्या) निमूणकर,अक्षय निमूणकर, पिंटू निमूणकर, विशाल नेटके, वैभव नेटके, आतिष रेपाळ, योगेश रेपाळ, स्वप्नील रेपाळ, सागर रेपाळ, ऋषीकेश बाईत, सत्यम गुरसळे, धनराज गुरसळे, सुरज दींडे, शैलेश दींडे, विशाल लोकरे, शरद उकार्डे, सुरज रेडेकर, शरद लांडे, राजेश तोडकरी, गणेश महाडिक, नकुल भंडारी आदी.नवरात्रौत्सव यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तसेच या कार्यक्रमात आबलोली पंचक्रोशीतील जनता बहूसंख्येने सहभागी होते. Navaratrautsavas begins at Aabloli