पुरवठादारांची नफेखोरी; दिर्घकालीन करारांवर परिणाम
गुहागर, ता. 28 : रशिया युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील नैसर्गिक वायुचा भाव पाचपटीने वाढला आहे. पुरवठादार कंपन्या नफाखोरीसाठी खुल्या बाजारपेठत उतरल्या असून त्याचा परिणाम भारतासारख्या दिर्घकालीन कराराने स्वस्त दरात वायु आणि तेल खरेदी करण्याऱ्या देशांवर झाला आहे. Natural gas prices quadrupled


भारत 80 टक्के पेट्रोल, डिझेल तयार करण्यासाठी लागणारे क्रुड ऑइल आणि नैसर्गिक वायु (एलएनजी) परदेशातून आयात करतो. त्यासाठी परदेशामधील पुरवठादार कंपन्यांशी दिर्घकालीन करार केले जातात. दिर्घकालीन करारामुळे पुरवठादाराला उत्पादन विकण्याची हमी मिळते. खरेदीदाराला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपेक्षा खूप कमी दराने आवश्यक माल दिर्घकाळापर्यंत मिळत रहातो. Natural gas prices quadrupled
नैसर्गिक वायुचा विचार केल्यास युनायटेड स्टेटस् आणि चीन नंतर भारत हा नैसर्गिक वायु खरेदी करणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. तर रशिया या नैसर्गिक वायु पुरवठा करणारा जगातील पहिल्या क्रमाकांचा देश आहे. युक्रेन आणि रशियामधील युद्धाचा परिणाम म्हणून रशियाकडून जगाला होणारा गॅस पुरवठ्याचे प्रमाण अत्यल्प झाले. सहाजिकच खुल्या बाजारपेठेत एलएनजीची मागणी वाढली. मागणीप्रमाणे उपलब्धता नसल्याने एलएनजीच्या किंमती गगनाला पोचल्या. Natural gas prices quadrupled


युक्रेन (Ukraine) रशिया युध्दापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नैसर्गिक वायुचे दर 6 डॉलर प्रति एमएमबीटीयु (मेट्रीक मिलियन ब्रिटीश थर्मल युनिट) असे होते. युद्ध सुरु झाल्यानंतर आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नैसर्गिक वायुचा दर 35 डॉलर प्रति एमएमबीटीयु आहे. म्हणजे एलएनजीच्या (LNG) दरात पाचपटीने वाढ झाली आहे. Natural gas prices quadrupled
सामान्यप्रमाणे आंतरराष्ट्रीय करार होताना उत्पादकाने कराराप्रमाणे पुरवठा केला नाही तर खरेदीदाराला ठरलेल्या दराच्या दुप्पट, तिप्पट रक्कम द्यावी लागते. क्रुड ऑईल आणि एलएनजीचे दर पाचपटीने वाढल्यामुळे पुरवठादारांना दंडापेक्षाही अधिक फायदा खुल्या बाजारपेठेत उत्पादन विकून होत आहे. त्यामुळे युद्धजन्य परिस्थितीचा फायदा करुन क्रुड ऑईल आणि एलएनजी पुरवठादार नफाखोरी करत आहेत. त्याचा विपरीत परिणाम भारतासारख्या आयातदारांना महागाईच्या रुपाने भोगावा लागत आहे. Natural gas prices quadrupled
ग्रॅझप्रोमला हवे आहे युरो चलन
युद्धजन्य परिस्थितीमुळे एलएनजीची रक्कम डॉलर ऐवजी युरो या चलनात द्यावी. असा नवा प्रस्तावर गॅझप्रोम कंपनीने गॅस ॲथॉरिटी ऑफ इंडिया (गेल) समोर ठेवला आहे. या कंपनीसोबत 20 वर्ष एलएनजी पुरवठा करण्याचा करार गेल ने 2018 मध्ये केला आहे. Natural gas prices quadrupled