वेबसाइटवर अर्ज करण्याचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे आवाहन
मुंबई, ता. 06 : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात येते. दरवर्षी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन नाव नोंदणी करण्याचं आवाहन केंद्रीय शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागानं केले आहे. ही नावे सन २०२२ च्या पुरस्कारासाठी घेतली जाणार आहेत. पात्र शिक्षकांनी २० जून २०२२ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी. असे आवाहन शिक्षण संचालक महेश पालकर यांनी केलं आहे. National Teacher Honors Register

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन नावे देण्यासाठी nationalawardstoteachers.education.gov.in या वेब पोर्टलवर नावनोंदणी सुरू झाली आहे. तरी या राष्ट्रीय पुरस्कारासाठी राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व मान्यताप्राप्त अनुदानित खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील इच्छुक पात्र शिक्षकांनी २० जून २०२२ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी केलं आहे. National Teacher Honors Register
