गुहागर, ता. 02 : नववर्षाच्या शुभारंभानिमित्त समाजात स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच स्वच्छता दूतांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डी. बी. जे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने ‘स्वच्छता संकल्प’ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. National Service Scheme honors cleanliness ambassadors
या उपक्रमाअंतर्गत चिपळूण नगरपरिषदेतील स्वच्छता दूतांना त्यांच्या दैनंदिन कामकाजात आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असणारे स्वच्छता सुरक्षा साहित्य (हॅण्ड ग्लोव्हज) राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांकडून वाटप करण्यात आले. स्वच्छता दूत हे समाजाच्या आरोग्याचे खरे शिल्पकार असून त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. National Service Scheme honors cleanliness ambassadors
या कार्यक्रमास चिपळूण नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी श्री. प्रमोद ठसाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात स्वच्छता दूतांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करून विद्यार्थ्यांनी सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. आरोग्य विभाग प्रमुख श्री. वैभव निवाते यांनी स्वच्छतेचा थेट संबंध आरोग्याशी असल्याचे सांगून अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतो, असे मत व्यक्त केले. National Service Scheme honors cleanliness ambassadors

कार्यक्रमास स्वच्छता निरीक्षक श्री. सुजित जाधव, श्री. विनायक सावंत, श्री. प्रविण जाधव, मुकादम श्री. दिपक किंजळकर, श्री. रोहन सकपाळ, श्री. मधुकर मोहीते तसेच नगरपरिषदेतील स्वच्छता दूत मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चिपळूण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. विशाल भोसले तसेच उपमुख्याधिकारी श्री. मंगेश पेढामकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले, तसेच या उपक्रमास नव कोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. मंगेशजी तांबे, डी. बी. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट, उपप्राचार्य स्नेहल कुलकर्णी , पर्यवेक्षिका डॉ. सुजाता खोत यांचे मार्गदर्शन व मोलाचे सहकार्य लाभले. डी. बी. जे. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. अविनाश पालशेतकर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, सेवाभाव व जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हेच या उपक्रमांचे खरे यश असल्याचे सांगितले. National Service Scheme honors cleanliness ambassadors
या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून स्वच्छता दूतांशी संवाद साधला व त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी रासेयो समिती सदस्य प्रा. सौ. सोनाली खर्चे उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी महाविद्यालयाच्या या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले. National Service Scheme honors cleanliness ambassadors
