संकलन : अनिकेत कोंडाजी, संघटनमंत्री, सागरी सीमा मंच
National Maritime Day: सिंधिया स्टीम नेव्हिगेशन या भारतीय मालकीच्या पहिल्या शिपिंग कंपनीच्या एसएस लॉयल्टी नावाच्या वाफेवर चालणाऱ्या पहिल्या जहाजाने ५ एप्रिल १९१९ रोजी मुंबई ते इंग्लड असा प्रवास केला. म्हणून 5 एप्रिल हा दिवस भारतात राष्ट्रीय सागरी दिवस म्हणून साजरा केला जातो. National Maritime day
सिंधिया स्टीम नेव्हिगेशनचा इतिहास
दळवळणासाठी केवळ रस्ते, हवाई मार्ग एवढेच पुरेसे नाही, तर परदेशात जाण्यासाठी सागरी मार्गाने वहातूक झाली पाहीजे. तर व्यापार वाढले. आपल्या देशातील उत्पादित माल परदेशात नेता येईल. या विचाराने प्रेरीत होवून मध्य भारतातील ग्वाल्हेरचे महाराज यांनी सिंधिया स्टीम नेव्हिगेश या कंपनीची 1914 मध्ये स्थापना केली. या कंपनीने 1915 मध्ये नेव्हल कन्स्ट्रक्शन ॲण्ड आर्मामेन्टस् (Naval Construction & Armaments Co,) या ब्रिटीश कंपनीकडून RMS Empress of India हे प्रवासी व माल वाहतुक करणारे जहाज विकत घेतले. या जहाजाला एसएस लॉयल्टी (S S Loyalty) असे नाव देण्यात आले. या जहाजाने आपल्या पहिल्या परदेश प्रवासाला 5 एप्रिल रोजी सुरवात केली.
ब्रिटीश राजवटीत, समुद्री मार्ग युरोपियन वसाहती राजवटींच्या नियंत्रणाखाली होते. या पार्श्र्वभुमीवर भारतातील स्वदेशी व्यावसायिक शिपिंग कंपन्यांसाठी हा प्रवास अत्यंत महत्त्वपूर्ण होता. म्हणूनच दळणवळणाच्या दृष्टीकोनातून 5 एप्रिला वेगळे महत्व आहे. मर्चंट नेव्ही (Merchant Navy) या संकल्पने बीज 5 एप्रिल 1919 रोजी लावले गेले. National Maritime day
National Maritime Day
भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1964 पासून हा 5 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय सागर दिन (National Maritime Day) म्हणून साजरा केला जात आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि अर्थव्यवस्थेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी 1964 मध्ये प्रथम भारतीय सागरी दिवस (राष्ट्रीय सागर दिन National Maritime Day) आयोजित करण्यात आला होता. National Maritime day
भारताला लाभलेला समुद्र किनारा आणि या माध्यमातून होणारी आयात-निर्यात देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारी आहे. या राष्ट्रीय नौकानयनाचे महत्व सर्वसामान्यांपर्यंत पोहचले नसले तरी हा दिवस देशाच्या अर्थकारणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. म्हणून हा दिवस साजरा केला जातो भारताच्या पूर्व किनार्यावरील चोल आणि पांड्य, पश्चिम किनार्यावरील चेर, विजयनगर आणि हिंदवी स्वराज्य या सागरी सत्तांच्या अस्तानंतर उदयाला आलेली पहिली संघटित व्यापारी पूर्णपणे भारतीय कंपनी आहे. या कंपनीचं पहिलं जहाज ‘सिंदिया शिपिंग’ 5 एप्रिल 1919 रोजी मुंबईहून लंडनकडे माल घेऊन निघाले होते. मात्र, याला ब्रिटिश शिपिंग कंपनीने विरोध केला होता. असे असताना त्यांच्या नाकावर टिच्चून भारतीय कंपनीचे जहाज मार्गस्थ झाले होते. याच दिवसाचे औचित्य साधून 5 एप्रिल हा राष्ट्रीय सागरी दिवस साजरा केला जातो. National Maritime day
आयात-निर्यातीवरच देशाच अस्तित्व अवलंबून देशातील आयात-निर्यात ही अखंड सुरु राहणारी प्रक्रिया आहे. याचे वेळोवेळी महत्व यापूर्वीही निदर्शनास आले होते. याच नौकानयनाच्या माध्यमातून 1960-70 या दशकामध्ये भारताला गहू आणि इतर धान्याची आयात करावी लागली होती. त्यावेळी याच व्यापारी जहाजांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. एवढेच काय अन्नधान्य थेट पोहचवलं गेल्याने याला ‘शिप टू माऊथ’ असंही संबोधले गेले होते. एकंदरीत ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अन्नधान्यासह इतर साहित्य आणि अर्थकारणाला बळकटी देणाऱ्या वस्तूंची आयात-निर्यात केली जाणारा हा दिवस असून याचे महत्व प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे आहे. National Maritime day
सागरी वाहतूक नौदलापेक्षा खूप वेगळी आहे. सागरी वाहतूक हा अनेक मोठ्या देशांचा कणा आहे. भारताचा 95 टक्के व्यापार हा सागरी मार्गाशी संबंधित आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत भारतीय जहाजे किती मोठी भूमिका बजावतात हे यावरून दिसून येते. भारतात राष्ट्रीय सागरी दिवस बंदरे, जहाज व जलमार्ग मंत्रालयातर्फे साजरा केला जातो. राष्ट्रीय सागरी दिनाच्या निमित्ताने नाविकांच्या सेवेला आणि राष्ट्रीय सागरी उद्योगाच्या संवर्धन आणि विकासामध्ये सहभागी असलेल्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान केला जातो. भारतीय सागरी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या लोकांसाठी हा दिवस कौतुकाचा दिवस आहे. भारताच्या राष्ट्रीय सागरी दिनानिमित्त एक पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो ज्या दरम्यान वरुण पुरस्कार काही लोकांना दिला जातो. भगवान वरुणाची मूर्ती आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे नाव आहे. ‘एनएमडी अवॉर्ड ऑफ एक्सलन्स’ देखील समारंभात दिला जातो ज्यामध्ये ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र असते. “सागरी शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी उत्कृष्ट योगदान” पुरस्काराचा एक भाग म्हणून करंडक आणि प्रशस्तीपत्र दिले जाते. सागरी शिक्षण आणि प्रशिक्षणात सातत्यपूर्ण योगदान दिल्याबद्दल लोकांचा सन्मान आणि ओळख. National Maritime day
आंतरराष्ट्रीय सागरी दिनावर एकमत नाही
जगभरात 8 जून हा दिवस ‘सागरी दिन’ म्हणून साजरा करावा, अशी संयुक्त राष्ट्रसंघाने 2008 साली घोषणा केली. त्यानुसार ‘दी ओशन प्रोजेक्ट’ व ‘दी वर्ल्ड ओशन नेटवर्क’ या संघटना संयुक्तपणे आठ जून या दिवशी जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये ‘सागरी दिना’च्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात.
तर जागतिक स्तरावरील ‘इंटरनॅशनल मारीटाइम ऑर्गनायझेशन’ ही संस्था दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात ‘सागरीय दिवसा’च्या सोहळ्याचे आयोजन करते आणि सागरी सुविधा, सागरी प्रवासातील सुरक्षा, अडचणी तसेच सागरी पर्यावरण या विविध निगडीत विषयांवर उहापोह करत असते. विविध देशात हा दिवस साधारणत: सप्टेंबरच्या अखेरच्या सप्ताहात निरनिराळ्या दिवशी साजरा होतो. National Maritime day
भारत एक ‘दर्यावर्दी’ देश
भारत (India) देशाला मोठ्या प्रमाणात समुद्र किनारा लाभलेला आहे. देशाच्या पूर्व-पश्चिम किनारपट्टीची लांबी आहे 7 हजार 516 किलोमीटर आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, प्रत्येक स्वतंत्र आणि सार्वभौम देशाचा, त्याच्या किनार्यापासून पुढे 200 सागरी मैल इतक्या अंतरापर्यंतचा, समुद्रातला आणि हवेतला प्रदेश हा रीतसर त्या देशाच्या मालकीचा असतो. त्या अनुषंगाने भारताची एकंदर किनारपट्टी 23 लाख, 5 हजार, 143 चौ.किमी इतक्या लांबीची आहे. म्हणजेच भारत हा एक ‘दर्यावर्दी’ देश आहे; तरीही आज भारताच्या जनमानसात सर्वात दुर्लक्षित विषय जर कोणता असेल, तर तो म्हणजे नौकानयन. आज अत्याधुनिक जगात व्यापारी माल वाहतुकीसाठी रेल्वे, रस्ते आणि विमानसेवा उपलब्ध आहे. त्या मार्गांनी मालवाहतूक होते देखील. पण, सर्वात स्वस्त वाहतूक म्हणजे नौकानयनच्या माध्यमातूनच होत आहे. National Maritime day