राष्ट्रीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानतर्फे पाच राज्यांतून निवड
Guhagar News : अंजनवेलचे माजी सरपंच यशवंत बाईत यांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार (National Award announced to Yashwant Bait) जाहीर झाला आहे. हा पुरस्कार कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईल, गोवाचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, बेळगावचे खासदार अमरसिंह पाटील, कनार्टक राज्यातील बिदर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस प्रमुख महेश मेघण्णावर, आदी मान्यवर पदाधिकारी असलेल्या विविध संस्थांच्याद्वारे देण्यात आला आहे.

बेळगावमधील एकात्मिक समाज कल्याण संस्था, चिक्कोडीतील राष्ट्रीय ग्रामीण विकास प्रतिष्ठान, गोवा हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळ, गुजराथमधील फाऊंडेशन चेअरमन आदी विविध संस्थांच्या माध्यमातून गेली चार वर्ष राष्ट्रीय गौरव पुरस्कार देण्यात येतात. या संस्था दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या राज्यात कार्यरत आहेत. या संस्थांचे पदाधिकारी देखील केंद्र आणि राज्य सरकारमध्ये मंत्री, मुख्यमंत्री तसेच उच्चस्तरीय अधिकारी आहेत. या सर्व संस्थांनी राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा नावाची एक समिती गठीत केली आहे. या समितीतर्फे गुहागर तालुक्यातील अंजनवेलचे माजी सरपंच यशवंत बाईत यांची राष्ट्रीय गौरव पुरस्कारासाठी निवड केली आहे. National Award announced to Yashwant Bait
National Award announced to Yashwant Bait
यशवंत बाईत यांना पुरस्कारासाठी निवड झाल्याचे पत्र आले आहे. या पत्रावर केंद्रीय मंत्री व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईल, गोवाचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, बेळगावचे खासदार अमरसिंह पाटील, कनार्टक राज्यातील बिदर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस प्रमुख महेश मेघण्णावर, कोल्हापूरचे महापौर राजू शिंगाडे, गुजरात राज्यातील फाऊंडेशनचे चेअरमन कोमल शर्मा, दिल्लीचे विशेष अभियंता जयराज लोंढे, कर्नाटकच्या होमगार्ड डिपार्टमेंटचे जिल्हा कमांडंट अरविंद घट्टी यांच्या सह्या आहेत.
Yashwant Bait
1990 च्या दरम्यान यशवंत बाईत मुंबईतील बँकेची नोकरी सोडून ते दाभोळ वीज कंपनीच्या लढ्यात उतरले. या लढ्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. एका बाजुला उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करुन न्यायालयीन लढाई लढत होते. दुसऱ्या बाजुला जनतेचे नेतृत्त्व करत आंदोलनात सहभागी व्हायचे. पराकोटीचा संघर्ष त्यावेळी त्यांनी केला. यामध्ये यशवंत बाईत यांची पुंजी संपली. पोलीसांनी अनेक गुन्हे दाखल केले. दबाव टाकला. मात्र कधीही हार न मानता ते लढत राहीले. त्यानंतरच्या काळात आंदोलनात्मक संघर्ष संपला तरीही गावातील जनतेच्या हितासाठी कंपनीबरोबर त्यांचा संघर्ष सुरुच होता. National Award announced to Yashwant Bait
सरपंच पदाच्या कार्यकाळात यशवंत बाईत यांनी गावातील अपंगांसाठी पेन्शन योजना राबवली. अनेक वाड्यापर्यंत रस्ते पोचवले. पर्यटनवाढीसाठी अंजनवेलमधील समुद्रकिनाऱ्यालगत सुशोभिकरण केले. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी वाचनालय सुरु केले. गावात बँक आणली. गावात आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा सुरु केली. गावातील सर्व मुलांना इंग्रजी शिकविण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत स्वतंत्र शिक्षक नेमले. गावाचा पाणी प्रश्र्न सोडविण्यासाठी सलग तीन वर्ष भूगर्भातील पाणीसाठ्याचा चाचण्या घेवून विंधन विहीरी बांधल्या. त्यावर आधारीत पाणी योजना सुरु केली. रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पासोबत कराबाबत कायदेशीर लढा उभा केला. कोरोना काळात ग्रामस्थांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष, स्वतंत्र प्राथमिक उपचार देणारे कोविड रुग्णालय सुरु केले. अशी अनेक लोकोपयोगी कामे यशवंत बाईत यांनी केली. त्याच या कामाची दखल आज राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे. बेळगावमधील एकात्मिक समाज कल्याण संस्था, चिक्कोडीतील राष्ट्रीय ग्रामीण विकास प्रतिष्ठान, गोवा हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळ, गुजराथमधील फाऊंडेशन चेअरमन आदी विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांना 26 मार्च रोजी पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. National Award announced to Yashwant Bait
