गुहागर, ता. 16 सेवा निवृत्तांची जनसेवा समिती, रत्नागिरी यांच्या वतीने देण्यात येणारा कै. ना. द. कार्लेकर स्मृती पुरस्कार 2024 – 25 चा हा पुरस्कार गुहागर तालुका पेन्शन संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार पाटील यांना देऊन गौरवण्यात आला. हा पुरस्कार सर्वोत्कृष्ट जनसेवा व समाजसेवा कार्य केल्यामुळे देण्यात येत असतो. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे होते. Nandkumar Patil gets Karlekar Memorial Award

नंदकुमार पाटील हे गुहागर एज्युकेशन सोसायटी मध्ये लिपिक म्हणून गेली अनेक वर्ष कार्यरत होते. ते नेहमीच समाजशील उपक्रमात सहभागी होत असत. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना गुहागर तालुका पेन्शन संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम सुरू केले. त्यांनी अनेकांना वैयक्तिक पातळीवर देखील मदत केली आहे. त्यांच्या या कार्याची पोचपावती म्हणून त्यांना कै. ना. द. कार्लेकर ( साघिक) पुरस्कार सेवा निवृत्तांची जनसेवा समिती जिल्हा रत्नागिरी चे अध्यक्ष वसंत झगडे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला अनंत रहाटे, विजय भाटकर, दिलीप पवार, मनोहर पवार, नयना ओटेकर आदी उपस्थित होते. Nandkumar Patil gets Karlekar Memorial Award