चिपळूण, ता. 03 : मराठवाडा नांदेड ही रेल्वे गाडी पनवेलपर्यंत येत आहे. तीच गाडी पुढे रत्नागिरीपर्यंत आणावी, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी केली होती. या मागणीला जवळजवळ मान्यता मिळाली आहे. Nanded Ratnagiri Railway


यासाठी रेल्वेचे अधिकारी रेल्वेमार्गाची पाहणी व सिग्नलचे नियोजन केले. नांदेड वरुन येणारी गाडी सध्या पनवेल पर्यंत येत आहे. तीच गाडी रत्नागिरीपर्यंत आता काही दिवसात येणार आहे. असे नियोजन करण्यात आले. यामुळे नांदेडशी कोकण रेल्वे मार्ग जोडले जाणार आहे. Nanded Ratnagiri Railway
शासनाचे बरेचशे अधिकारी नांदेड येथुन कोकणामध्ये नोकरीसाठी कार्यरत आहेत. त्यांना ही गाडी सोईची ठरेल. कोकण रेल्वे मार्ग हा नांदेडशी जोडला जाणार आहे. यामुळे विकासालाही चालना मिळेल. तसेच चिपळूण कराड रेल्वे मार्ग जोडले जावे, असेही प्रयत्न सुरु आहेत. अशी माहीती कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी दिली आहे. Nanded Ratnagiri Railway