• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 June 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर बाजारमधील सभागृहाचे नामकरण

by Manoj Bavdhankar
May 4, 2022
in Guhagar
17 0
0
Naming of Guhagar Bazaar Hall

MLA Rambhau Bendal

34
SHARES
97
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

लोकनेते माजी आमदार स्व.रामभाऊ बेंडल यांचे नाव

गुहागर, ता. 04 : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा गुहागर (मुंबई व ग्रामीण) च्या वतीने शुक्रवार दि. ६ मे २०२२ रोजी सकाळी ११ वा. गुहागर बाजार भवन, श्रुंगारतळी, ता.गुहागर येथील सभागृहाला ” लोकनेते माजी आमदार स्व.रामभाऊ बेंडल सभागृह “असे नामकरण करण्यात येणार आहे.  Naming of Guhagar Bazaar Hall

या कार्यक्रमाला तालुकावासियांनी उपस्थित रहावे असे आवाहन  रामचंद्र र.हुमणे गुरुजी (अध्यक्ष, ग्रामीण शाखा), कृष्णा वि .वणे (अध्यक्ष, मुंबई शाखा), तुकाराम बा.निवाते गुरुजी (सरचिटणीस, ग्रामीण शाखा), अनंत स.मालप (सरचिटणीस, मुंबई शाखा), यांनी केले आहे.

Naming of Guhagar Bazaar Hall

माजी आमदार स्व.रामभाऊ बेंडल यांच्या कार्याचा आढावा.

एक असामान्य व्यक्तिमत्त्व, दिन दुबल्यांचे-रंजल्या गांजलेल्यांचे कैवारी. ज्या समाजात जन्माला आले त्या कुणबी समाजाची  शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक व सामाजिक दैनावस्था पाहून त्यामध्ये बदलत्या काळानुसार आमुलाग्र बदल घडविण्यासाठी रात्रंदिवस झटणारे वेळप्रसंगी पोलीस खात्यातील उच्च पदावरील मोठ्या पगाराच्या शासकीय नोकरीचा समाज उन्नतीसाठी त्याग करणारे सच्चे समाज सेवक. Naming of Guhagar Bazaar Hall

  • दि. १ ऑक्टोबर १९२० रोजी स्थापना झालेल्या कुणबी समाजोन्नती संघ मुंबई या मध्यवर्ती संघाचे काही काळ सरचिटणीस.
  • सन १९५४ पासून गुहागर तालुक्यातील कुणबी समाजाला नवी दिशा देण्याचे अर्थात समाज संघटित करण्याचे काम सुरू केले.
  • सन १९६९ ला गुहागर तालुका शाखेचे पुनर्गठन झाल्यापासून २४ जुलै १९९४ पर्यंत शाखेचे अध्यक्षपद भूषविले.
  • समाजातील मुलांना माध्यमिक शिक्षण घेता यावे यासाठी संत तुकाराम छात्रालय सुरू केले. यासाठी छात्रालयातील मुलांना पायली फंडाच्या माध्यमातून धान्य गोळा केले.
  • समाज संघटनेचे काम करतानाच कॉंग्रेस पक्षाचे त्यांनी काम केले. तालुक्यामध्ये कॉंग्रेस पक्षाची पध्दतशीर उभारणी केल्यामुळे पक्ष नेतृत्वाने त्यांना तालुका कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. ती त्यांनी अनेक वर्षे पार पाडली.
  • सन १९७९ मध्ये तत्कालीन प्रांताध्यक्ष मा.स्व.बाळासाहेब सावंत यांनी त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवून सन्मानित केले.
  • सन १९८० साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत संघ शक्तीच्या जोरावर आमदार म्हणून निवडून आले. या कार्यकाळात सुडाचे राजकारण न करता तसेच जाती- धर्माचा विचार न करता तळागाळातील सर्वसामान्य घटकांसाठी अनेक विकास कामे पूर्ण केली.

 विधान सभा कार्यक्षेत्र

गुहागर तालुका, चिपळूण तालुका-रामपूर विभाग, संगमेश्वर तालुका-माखजन विभाग कार्यक्षेत्राचा विकास कामाशिवाय वंचित असलेला भौगोलिक विभाग आणि तत्कालीन तुटपुंजा मिळणारा आमदार निधी लोक कल्याणासाठी पूरेपूर वापरून त्यांनी केलेल्या विकास कामाची ही ओझरती झलक. Naming of Guhagar Bazaar Hall

   १९  –  नळपाणी योजना
   ५२  –  बोअरिंग विहिरी   
७२  – गावांमध्ये विद्युत पुरवठा
   ३०  – पुल व मोऱ्या   
०२  – बजेटमधील मोठे रस्ते
   ३३  – छोटे सस्ते
   १७  – नवीन शाळा दुरुस्तीची कामे 
 ०३  -खार बंधारे व बंधाऱ्यांची   दुरुस्ती   
०२  – आरोग्य केंद्रे
०१  – गुहागर येथे आधुनिक बस स्थानक
०६  – नविन एस.टी. गाड्यांचे मार्ग

गुहागर येथील कॉलेजला शासन मान्यता. याशिवाय संत तुकाराम घाऊक व किरकोळ ग्राहक सहकारी भांडारची निर्मिती. गाव तेथे दुकान ही मोहीम अशा प्रकारे लोकोपयोगी कार्य त्यांनी केले. Naming of Guhagar Bazaar Hall

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMLA Rambhau BendalNaming of Guhagar Bazaar HallNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.