संजय नेवासकर; नामदेव समाज मुक्ती परिषदची नवीन जिल्हा कार्यकारिणी
गुहागर, ता. 14 : पंढरपूर येथील नामदेव महाराजांच्या स्मारकांच्या 90 कोटीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून त्याला लवकरच मंजुरी मिळेल, अशी माहिती नामदेव समाजोन्नती परीषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संजयजी नेवासकर यांनी दिली. Namdev Maharaj temple proposal in final stage
नामदेव समाजोन्नती परीषद महाराष्ट्र राज्य, अंतर्गत रत्नागिरी विभागाची सभा जेष्ठ नागरीक संघ, देवरुख यांचे कार्यालयामध्ये संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर मूख्य विश्वस्त राजेंद्रजी पोरे, सचिव प्रविणजी शिंत्रे, कार्यवाहि मंडळाचे अध्यक्ष विक्रांत डोंगरे, कोकण विभागिय उपाध्यक्ष अनंतराव टमके व संगमेश्वर तालुकाध्यक्ष अशोकजी कुमटेकर जिल्हाध्यक्ष दत्तात्रय भस्मे उपस्थित होते. Namdev Maharaj temple proposal in final stage
आपली संस्था 119 वर्ष काम करतआहे. पंढरपूरमध्ये येथील स्मारकाच्या भूमिपूजनाला आपण लाखोच्या संख्येने उपस्थित राहूया. पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी येणारा भक्तगण आपले नामदेव महाराजांचे स्मारक बघितल्याशिवाय पुढे जाणारच नाही, असे आदर्श स्मारक आपण उभे करणार आहोत. आपल्या आर्थिक विकास महामंडळाचे कामही अंतिम टप्प्यात असल्याचे संजयजी नेवासकर यांनी सांगितले. Namdev Maharaj temple proposal in final stage

रत्नागिरी जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत, नगरपरीषदेच्या निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या शिंपी समाजातील नगरसेवक सौ. साक्षी मानकर ( लांजा ), सौ. वर्षा ढेकणे ( रत्नागिरी ), अंकुश आवले (चिपळूण) तसेच श्री.संजय वेल्हाळ ( देवरुख ) यांचा सत्कार करणेत आला. Namdev Maharaj temple proposal in final stage
तसेच नामदेव समाज मुक्ती परिषद शाखा रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय भस्मे यांच्या उपस्थितीत नवीन जिल्हा कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली. यात अनिल सदरे कार्याध्यक्ष, उपाध्यक्षपदी राजेंद्र गजानन पेटकर, प्रदिप कोळेकर, सचिवपदी सचिन हेंद्रे, चेतन पाडळकर सहसचिव, संदिप वेल्हाळ, खजिनदार सौ. मनाली बावधनकर प्रसिध्दि प्रमुख तर सदस्या सौं. अरुणा पेटकर, सौं. प्रणिता कपडेकर, प्रभाकर कोळेकर, संदेश आंबेकर, मंदार बावधनकर, सुनील सदरे श्रीकांत नामदेव कपडेकर, शांताराम मुद्राळे, दिपक बागडे, जगदीश यशवंत आवले, सौ रेश्मा बारटक्के, अशोक कुमटेकर, प्रदीप पाडळकर, मंगेश विंचू, अजय डंबे तसेच सल्लागार पदी विवेक रेळेकर, जयप्रकाश गणपत पाखरे, स्वप्नील खटावकर यांची निवड करण्यात आली आहे. सौ. तृप्ती कुमटेकर यांनी सर्व समाजबांधव यांचे आभार मानून अध्यक्षांचे वतीने कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. श्वेता दत्तात्रय भस्मे यांनी केले. Namdev Maharaj temple proposal in final stage
