• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 October 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राजापूरात नमन लोककला संस्थेची स्थापना

by Mayuresh Patnakar
February 22, 2022
in Guhagar
21 0
0
Naman Folk Art

Naman Folk Art

41
SHARES
118
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, दि. 22 :  नमन लोककला (Naman Folk Art) व कलाकारांच्या न्याय हक्कासाठी,  घटनात्मक नोंदणी करून लोककला संस्थेची स्थापना करण्यात आली. संपूर्ण कोकणसह महाराष्ट्रात संस्थेचा प्रसार, प्रचार, सुरू आहे. प्रत्येक तालुका पातळीवर शाखा स्थापित करण्याचे कार्य सुरू आहे. रविवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२२ रोजी. राजापूर येथे “भू”  ग्रामपंचायत सभागृहात  नमन लोककला संस्था (भारत)  राजापूरची स्थापना झाली. या शाखेचे शुभारंभ  संस्थेचे अध्यक्ष, श्री रवींद्र मटकर यांच्या  शुभहस्ते करण्यात आले. 

स्थापना सोहळा सभेची सुरुवात दिपप्रज्वलन व  महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून  फटाक्यांच्या आतषबाजीत करण्यात आली.  त्यानंतर जेष्ठ नमन कलावंत स्वागताध्यक्ष:, श्री धनाजी सूर्या तांबे यांनी उपस्थित  मान्यवरांचे  व प्रमुख पाहुण्यांचे परिचय करून दिला. नमनकर कलाकार  मंडळींचे स्वागत गीताने करण्यात आले. व मान्यवरांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. 

नमन लोककला (Naman Folk Art) संस्थेचे अध्यक्ष, श्री रविंद्र मटकर यांनी, नमन लोककला संस्था ( भारत) संलग्न -राजापूर तालुका शाखेचे स्थापन सोहळा, आपल्या सर्वांच्या सहकार्याने संपन्न झाले असे  अधिकृत घोषणा केली. आजपासून  नमन लोककला संस्था  (भारत) संलग्न- तालुका शाखा राजापूर आपल्या न्याय हक्कासाठी व कलाकारांच्या उन्नती करीता रुजू होत आहे.  आजवर जे प्रेम आम्हाला दिलात तसंच प्रेम नमन लोककला संस्थाप्रति असावे. अशी अपेक्षा मटकर यांनी व्यक्त केली.

Naman Folk Art
Naman Folk Art

पदावर आम्ही असू नसू परंतु संस्था ही कायमस्वरूपी राहिली पाहिजे, वाढली पाहिजे. असे मनोगत उपस्थित कलावंत पदाधिकाऱ्यांनी  व्यक्त केले. त्याच प्रमाणे मान्यवरांनी आपल्या भाषणातुन, नमन लोककलावंताच्या न्याय हक्कासाठी उभी राहिलेली चळवळ भविष्यात नक्कीच परिवर्तन घडवून लोककलावंतांना न्याय प्राप्त करून देईल. असे सांगत नमन लोककलेप्रती प्रबोधन, मोलाचे मार्गदर्शन करत संस्थेच्या पुढील वाटचलीकरीता शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमात (Naman Folk Art) राजापूर शाखेची ग्रामीण/ मुंबई कार्यकारणी जाहीर करण्यात आली. राजापूर तालुका अध्यक्ष श्री धनाजी तांबे,  सचिव अशोक डोंगरकर, खजिनदार विजय मांडवकर, मुंबई कार्यकारणी मध्ये संदेश कुंभार, सुरेश मांडवकर, गुणाजी निनावे,  महेश भोवड, पिंकेश बापर्डेकर, यतीश रांबाडे यांची नियुक्ती करण्यात आली.

सदर स्थापन सोहळ्याला प्रमुख मान्यवर नमन लोककला (Naman Folk Art) संस्थाचे अध्यक्ष श्री रविंद्र मटकर, महासचिव/ पत्रकार- श्री शाहिद भाई खेरटकर, सचिव श्री सुधाकर मास्कर, उपाध्यक्ष श्री रमाकांत जावळे, सदस्य श्री उदय दणदणे, श्री मोहन पाडावे, श्री झराजी वीर (रत्नागिरी),  तसेच श्री सदानंद चव्हाण ( माजी पंचायत समिती, सभापती) श्री शिवाजी तेरवणकर (कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, अध्यक्ष) श्री संजय सरफरे ( जेष्ठ उद्योजक),  श्री वसंत तांबे ( सरपंच-भू) दिपक कोतापर (पोलीस पाटील) उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे (Naman Folk Art)  प्रसार, प्रचार नियोजन विजय मांडवकर (पेडखले),  तुकाराम राऊत ( खिणगणी), धनाजी तांबे (भू), सीताराम निनावे (पेडखले), अशोक डोंगरकर (खिणगणी),  यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अशोक डोंगरकर यांनी केले. सूत्रसंचालन श्री माधव क्षीरसागर यांनी केले. नवनिर्वाचित अध्यक्ष श्री धनाजी तांबे यांनी उपस्थितांचे व  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला, असे जाहीर केले.

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNaman Folk ArtNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share16SendTweet10
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.