गुहागर, ता. 01 : तालुक्यातील तवसाळ तांबडवाडीत नागपंचमी आनंदात साजरी करण्यात आली. कोकणात परंपरेचे सातत्य राखण्यासाठी महिलावर्ग नागदेवतेच्या पूजेत सामूहिक सहभाग घेतात. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमी साजरी करण्यात येते. या सणाला विशेष महत्त्व दिले जाते. Nagpanchami celebrated at Tavasal

नागपंचमी हा सापांचा सन्मान करण्याचा दिवस आहे, ज्यांना भगवान शिवाशी जोडलेले मानले जाते. असे मानले जाते की, या दिवशी दूध अर्पण केल्याने आणि सापांची पूजा केल्याने वाईट शक्तींपासून लोकांचे रक्षण होते. हा दिवस हानीपासून संरक्षण मिळविण्यासाठी आणि घरात यश आणि आनंदासाठी प्रार्थना करण्यासाठी देखील पाळला जातो. या दिवशी नागदेवतेला दूध, लाह्या, फुले अर्पण करण्याची प्रथा आहे. Nagpanchami celebrated at Tavasal

कोकणात विशेषतः शेताच्या बांधावर उगवलेल्या घोमेटीच्या वेली मान दिला जातो. तेडसा, सोनवली, तीळाची फुले तसेच निसर्गात फुललेली विविध फुले वापरून पूजा केली जाते. अख्खा भात, लाह्या, साखर किंवा गूळ, काळे पांढरे तीळ वापरून नैवेद्य दाखवला जातो. अशा प्रकारे नागपंचमीचा उत्सव धार्मिक श्रद्धा आणि गोडवा जपत पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. Nagpanchami celebrated at Tavasal