बोटीला लावली आग, मृत तांडेल साखरीआगरचा
गुहागर न्यूज : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी साखरी आगर गावातील रवींद्र नाटेकर याचा खून झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. देवगड परिसरात मच्छीमारी करण्यासाठी गेलेल्या बोटीवरील खलाशाने सोमवारी दुपारी आपल्याच बोटीचा तांडेल असलेल्या रवींद्र नाटेकर यांचे शीर धडावेगळे केले. त्यानंतर बोटही पेटवून दिली. या घटनेमुळे सर्वच मच्छीमारांना धक्का बसला आहे. Mysterious Murder of Fisherman
Mysterious Murder of Fisherman
गुहागर तालुक्यातील साखरी आगर येथे रहाणारे रविंद्र नाटेकर हे राजिवड्यातील एका बोटीवर तांडेल म्हणून नोकरीला आहेत. आज देवगड परिसरात मच्छी मिळत असल्याचे संदेश आल्यावर खोल समुद्रात मच्छीमारीला गेलेल्या अनेक बोटी देवगड परिसरात गेल्या. यामध्ये नाटेकर यांचीही बोट होती. दुपारी याच बोटीवरील परप्रांतिय खलाशाने तांडेलचा खून केला. त्यांचे शीर धडावेगळे करुन बोटीवर ठेवले. एवढे करु हा खलाशी थांबला नाही. त्याने आपल्याच बोटीलाही आग लावली. या सगळ्या धक्कादायक प्रकाराचे आकलन होऊन काही करेपर्यंत बोट जळू लागली होती. त्यामुळे बोटीवरील अन्य खलाश्यांनी आजुबाजुच्या बोटींकडे मदतीसाठी पुकारा केला. मात्र हा खलाशी त्याच बोटीवर बसून राहीला होता. Mysterious Murder of Fisherman
आजुबाजुच्या बोटींनी या खलाश्याना मदत करत सुखरुप बंदरात आणले. तसेच या घटनेची खबर पोलीसांना दिली. तातडीने देवगडमधील पोलीसांनी संबंधित खलाश्याला ताब्यात घेतले आहे. तसेच जळणारी बोटही विझवून देवगड बंदरात आणली आहे. आता हा सगळा प्रकार नेमका का घडला, कसा घडला याची चौकशी देवगड पोलीस करीत आहेत. Mysterious Murder of Fisherman
या घटनेची माहिती कळताच साखरीआगरमधील काही मच्छीमारांनी तातडीने देवगडकडे धाव घेतली आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी अशी घटना घडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. दोन महिने सोबत रहाणारा सहकाऱ्याने असे माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य का केले असा प्रश्र्न सर्वांना भेडसावत आहे. Mysterious Murder of Fisherman