कुलगुरू प्रा. पेडणेकर यांची रत्नागिरी उपपरिसरला सदिच्छा भेट
गुहागर, ता. 30 : मुंबई विद्यापीठाला (Mumbai University) नॅकमध्ये (NAAC) A++ ग्रेड 3.68 CGPA सह मिळाले. यासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्द्ल कुलगुरू यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक व कर्मचारी यांना मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. नॅकमध्ये मिळालेलं यश हे सर्वांच्या मेहनतीचं फळ आहे. 165 वर्षांचं असलेले हे मुंबई विद्यापीठ किती गौरवशाली आहे, आणि याच विद्यापीठात काम करण्याची संधी आपल्या सारख्या कर्मचाऱ्यांना मिळाली आहे हे आपलं भाग्य आहे, असेही यावेळी कुलगुरू प्रा सुहास पेडणेकर म्हणाले. Mumbai University succeeds in NAAC


या कार्यक्रमासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव सुधिर पुराणिक, अधिष्ठाता कॉमर्स अँड मॅनेजमेंट डॉ. अजय भामरे, संचालक विद्यार्थी विकास विभाग डॉ.सुनील पाटील व अभियंता विनोद पाटील उपस्थित होते. Mumbai University succeeds in NAAC


कुलगुरूच्या रत्नागिरीतील सदिच्छा भेटीदरम्यान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी उपपरिसराच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर नॅकमध्ये(NAAC) मुंबई विद्यापीठाला A++ ग्रेड 3.68 CGPA सह मिळाली यासाठी योगदान दिल्याबद्द्ल कुलगुरू यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठाचे मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले यावेळी रत्नागिरी उप परिसराचे प्रभारी संचालक डॉ श्रीकिशोर सुखटणकर, कुलसचिव अभिनदांन बोरगावे यांच्यासह प्राध्यापक वर्ग व कर्मचारी उपस्थित होते. Mumbai University succeeds in NAAC