• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 November 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दसरा मेळाव्यासाठी मुंबई पोलीस सज्ज

by Guhagar News
October 2, 2025
in Old News
42 0
1
82
SHARES
233
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

२० हजारांपेक्षा अधिक पोलीसांचा फौजफाटा असणार तैनात

मुंबई, ता. 02 : शिवसेना (शिंदे गट)आणि शिवसेना (उबाठा) पक्षांचे मेळावे आज, गुरुवारी वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत. या दोन्ही मेळाव्यांत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. त्यातच दसरा असल्याने अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रम, रावणदहन, तसेच अनेक मंडळांच्या देवींच्या मूर्तींचे विसर्जनही आहे. सुमारे वीस हजारांपेक्षा अधिक मनुष्यबळ मुंबईत ठिकठिकाणी तैनात करण्यात येणार आहे. Mumbai Police ready for Dussehra gathering

शिवसेनेचा मेळावा गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये, तर शिवसेना (उबाठा) पक्षाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. विक्रमी गर्दी होणार असल्याचा दावा दोन्ही पक्षांकडून केला जात असून या मेळाव्यांसाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत. मुंबईत येताना किंवा आल्यावर हे कार्यकर्ते समोरासमोर येऊन वादविवाद होऊ नयेत, यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. दोन्ही मेळाव्यांच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल, असे कोणतेही कृत्य करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. Mumbai Police ready for Dussehra gathering

मुंबईत काही ठिकाणी रावणदहन करण्यात येणार आहे. दसऱ्याच्या दिवशी मुंबईतील अनेक मंडळे देवींच्या मूर्तींचे विसर्जन करतात. यासाठी काढण्यात येणाऱ्या मिरवणुका, तसेच विसर्जनासाठी मुंबईतील चौपाट्यांवर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. सात अतिरिक्त पोलिस आयुक्त, २६ पोलिस उपायुक्त, ५२ सहायक पोलिस आयुक्त, २,८९० पोलिस अधिकारी, सोळा हजार ५५२ पोलिस अंमलदार, एसआरपीएफ प्लाटून, जलद प्रतिसाद पथके, दंगल नियंत्रण पथके, डेल्टा, कॉम्बॅक्ट, तसेच होमगार्ड. नियमांचे भान ठेवून सर्व नागरिकांनी दसरा, नवरात्रोत्सव आनंदात साजरा करावा. मेळावे, विसर्जन मिरवणुका, चौपाट्या अथवा इतर गर्दीच्या ठिकाणी कोणी संशयास्पद व्यक्ती किंवा बेवारस वस्तू आढळल्यास त्याबाबत तत्काळ माहिती द्यावी. मदतीसाठी हेल्पलाइन १००/११२ येथे संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई पोलिसांच्या वतीने करण्यात आले. Mumbai Police ready for Dussehra gathering

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMumbai Police ready for Dussehra gatheringNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share33SendTweet21
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.