(खरं तरं गुहागर न्यूज Mugdha_n_Prathamesh – आमचं ठरलयंअशा बातम्या कधी देत नाही. पण तरीही गुहागरमधील श्री दुर्गादेवी देवस्थानबरोबर आणि स्वाभाविकच गुहागरकरांबरोबर प्रथमेश लघाटे यांच असलेलं नातं, सारेगमप लिटल चॅम्पस्मुळे सर्वांची लाडकी झालेली मुग्धा वैशंपायन आणि नाटक, चित्रपटातील कलाकार आणि निवेदिका म्हणून सर्व परिचित सौ. स्पृहा जोशी लघाटे या नात्यामुळे एक गमतीशीर किस्सा आज गुहागर न्यूजच्या वाचकांबरोबर शेअर करत आहे.)
Mugdha_n_Prathamesh
सा रे ग म प या रिॲलिटी शो मधील Little Champs च्या पहिल्या पर्वाने अनेकजणांना वेड लावलं होतं. रामायण, महाभारत या दोन मालिकांनंतर अनेक वर्षांनी घराघरात या लहान मुलांच्या गाण्याचा कार्यक्रम (Little Champs) कोणीच चुकवला नव्हता. प्रथमेश लघाटेला या पर्वाने मोदक असे टोपण नाव दिले. हे सर्व लिटील चॅम्प्स आता मोठे झालेत. आता त्यापैकी काहीजणांची क्षेत्रही बदलली आहेत. मात्र काही ना काही निमित्ताने ही सर्व मंडळी टी.व्ही., न्यूज चॅनेलमधुन झळकतात आणि सर्वांना पुन्हा त्या कार्यक्रमाची आठवण करुन देतात.
यापैकी मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे एकत्रितपणे गायनाचे अनेक कार्यक्रम करतात. दोघही सामाजिक माध्यमांवर सक्रीय असल्याने सातत्याने अशा कार्यक्रमांचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. त्यामुळे ते प्रितीच्या बंधनात अडकलेत अशी चर्चा गेली दिड दोन वर्ष सुरु होती.
Mugdha_n_Prathamesh
गेले अनेक दिवस चर्चेत असलेल्या मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) आणि प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) यांच्या लग्नाची गोड बातमी नुकतीच दोघांनी अधिकृतपणे जाहीर करुन टाकली. इन्स्टाग्रामवर दोघांनी टाकलेल्या आमचं ठरलयं या पोस्ट चर्चेत आल्याच, पण त्याचबरोबर नात्यांची गुंफण सांगणाऱ्या स्पृहा जोशी (Spruha Joshi), अवधुत गुप्ते (Avdhoot Gupte), मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांच्या संवादाने आमचं ठरलयं या पोस्टची रंगतच वाढवली.
Mugdha_n_Prathamesh
ज्यावेळी प्रथमेश लघाटे ने इन्स्टावर आमचं ठरलंय अशी पोस्ट टाकली त्यावेळी या पोस्टवर स्पृहा जोशी यांनी – वा बुवा….. वेलकम वहिनी अशी कमेंट दिली. त्यावर प्रथमेश आणि मुग्धांने धन्यवाद दिले. पण खुपते तिथे गुप्ते या शोचे निर्माता, दिग्दर्शक अवधुत गुप्ते यांनी स्पृहाला प्रश्र्न विचारला की, मुग्धाला शुभेच्छा दिल्या पण प्रथमेशला शुभेच्छा नाही दिल्या ?


अवधुत गुप्ते यांच्या प्रश्र्नाला उत्तर देताना सौ. स्पृहा (वरद लघाटे ) म्हणाल्या की, ओह् सर, ते (म्हणजे प्रथमेश) आधीच सासरे आहेत माझे.


त्यावर मुग्धा वैशंपायन यांनी पोस्ट केले की, मला जेव्हा हे कळले तेव्हा मी ही आश्चर्यचकीत झाले की म्हणजे मी सासू…….. नाही. लगेच प्रथमेश लघाटे यांनीही … हो मी सासरा आहे तिचा, अशी पोस्ट टाकली. Mugdha_n_Prathamesh
सर्वजण प्रथमेश आणि मुग्धाचे अभिनंदन करत आहेतच त्याचवेळी या संवादामुळे नवी नाती समोर आली सर्वांचेच मनोरंजनही झाले. Mugdha_n_Prathamesh