उपकेंद्रातील सुरक्षा रक्षकाच्या मृत्यूनंतर केली नाही चौकशी
गुहागर, ता. 19 : शहराच्या उपकेंद्रातील सुरक्षा रक्षकाचा घरी मृत्यू झाला. या घटनेनंतर महावितरणाचा एकही अधिकारी, कर्मचारी या सुरक्षा रक्षकाच्या मदतीसाठी, चौकशीसाठी फिरकला नाही. उलट सुरक्षा रक्षक कंत्राटी होता. त्यांचा मृत्यू उपकेंद्राच्या आवारात झाला नाही. त्यांचे नातेवाईक येणार होते. भरपूर पाऊस पडत होता. म्हणून आम्ही गेलो नाही. अशी उत्तरे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे महावितरणचे अधिकारी माणूसकी विसरले अशी चर्चा सध्या गुहागरमध्ये सुरु आहे. MSEDCL forgot humanity

गुहागर शहरासाठीचे महावितरणचे उपकेंद्र खालचापाट तांबडवाडीमध्ये आहे. या उपकेंद्रामध्ये कोळथरे, ता. दापोली येथील अंकुश रघुनाथ झगडे, वय 44 हे कंत्राटी सुरक्षारक्षक आहेत. ते तांबडवाडीतील रविंद्र मालप यांच्या घराशेजारी भाड्याच्या खोलीत एकटेच रहात असतं. त्यांची नियुक्ती सुरक्षा रक्षकाची असली तरी उपकेंद्रातील अनेक तांत्रिक गोष्टी माहिती त्यांना होती. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी नसताना या उपकेंद्राचा सांभाळ अंकुश झगडे करायचे.
शनिवारी (ता. 18) सकाळी त्यांची प्रकृती बिघडली. असगोलीतील डॉ. पाटील यांच्याकडून औषधे घेवून, गुहागर बाजारपेठेतील कामे करुन ते पुन्हा तांबडवाडीत आले. सायंकाळी पुन्हा त्यांची प्रकृती बिघडली. रात्री 8 ते 9 च्या दरम्यान त्यांना हृदविकाराचा झटका आला. मालप यांच्यासह आजुबाजुच्या घरातील मंडळींनी तातडीने डॉक्टरांना बोलावले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तांबडवाडीतील ग्रामस्थांनी याची माहिती महावितरणसह झगडे यांच्या कुटुंबाला सांगितली. कोळथरे येथून झगडे यांचे नातेवाईक तातडीने निघाले. रात्री 12 वा. ते तांबडवाडीत पोचले. डॉक्टर पाटील यांच्याकडून मृत्यू प्रमाणपत्र घेवून अंकुश झगडे यांच्यासह पुन्हा कोळथरेकडे रवाना झाले. MSEDCL forgot humanity
MSEDCL forgot humanity
मात्र रात्री 8 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंतच्या कालावधीत महावितरणचा एकही अधिकारी, कर्मचारी तांबडवाडीत अंकुश झगडे यांची चौकशी करण्यासाठी, मदतीसाठी धावून आला नाही. ग्रामस्थांबरोबर एका अधिकाऱ्यांचे बोलणे झाले. परंतू यावेळीही तुम्हाला काही मदत हवी आहे का अशी विचारणा अधिकाऱ्यांनी केली नाही. याबाबत रविवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तेव्हा सदर अधिकाऱ्यांने दिलेले उत्तर माणुसकीला लाजवेल असे होते. हे अधिकारी म्हणाले की, सदर सुरक्षा रक्षकाची नियुक्ती एका ठेकेदारामार्फत कंत्राटी पध्दतीने झाली होती. सकाळपासूनच त्यांची तब्येत बिघडली होती. त्यामुळे ते कामावरही आले नव्हते. मालप यांनी त्यांच्या पाहुण्यांना कळवले होते. पाहुणे येवून त्यांच्या जबाबदारीवर अंकुश झगडेंना ते घेवून गेले. आम्ही शृंगारतळीला होता. पाऊस असल्यामुळे आम्ही गेलो नाही. MSEDCL forgot humanity
महावितरणच्या या वागण्यामुळे तांबडवाडी परिसरात नाराजी आहे. याच वाडीत रहाणारे गुहागर नगरपंचायतचे स्विकृत नगरसेवक संजय मालप म्हणाले की, उपकेंद्रात लाखो रुपयांची चोरी झाली असती याच अधिकाऱ्यांनी सुरक्षारक्षकाला जबाबदार धरले असते. पण त्या कर्मचाऱ्यांचा लाखमोलाचा जीव गेला त्याची किंमत महावितरणला नाही. MSEDCL forgot humanity
