• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 December 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पावसाळा आला; वीज अपघात टाळा

by Ganesh Dhanawade
June 17, 2022
in Bharat
17 0
0
MSEDCL appeals to citizens
34
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नागरिकांना महावितरणचे आवाहन

मुंबई, ता.17 : कोकण परिमंडळ- पावसाळ्याच्या दिवसात वीजेमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी प्रत्येकाने जीवित व वित्त सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क राहून प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करणे आवश्यक आहे. तेंव्हा अपघातमुक्त पावसाळ्यासाठी नागरिकांनी विद्युत सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. MSEDCL appeals to citizens

पावसाळ्याचे दिवसात वीजयंत्रणेतील तारा तुटणे , खांब वाकणे वा पडणे, रोहित्र (डिपी स्ट्रक्चर)वाकणे वा पडणे, वीजतारांवर झाड वा झाडांची फांदी तुटून पडणे असे प्रकार होतात. तुटलेल्या वीजेच्या तारा, वीज खांब, स्टे वायर, वितरण रोहित्र आदीसह विद्युत यंत्रणेतील कोणत्याही उपकरणांना स्पर्श करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी स्पर्श करणे टाळावे. याबाबत महावितरणच्या नजिकच्या कार्यालयास त्वरीत सूचना द्यावी. ग्राहकांना दर्जेदार व तत्पर वीजसेवा पुरविणे महावितरणचे लक्ष्य आहे. वादळ-वारा व पावसामुळे वारंवार वीजपुरवठा खंडीत होतो. विद्युत यंत्रणेतील कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असतात. तेंव्हा नैसर्गिक आपत्ती वा तांत्रिक कारणामुळे वीजपुरवठा खंडीत झाल्यास नागरिकांनी संयम बाळगुन सहकार्य करावे. MSEDCL appeals to citizens

पावसाळ्यात पक्षी बसून तारा एकमेंकांच्या संपर्कात आल्यास, वीजतारांवर फांदी पडल्याने तारा तुटून पडणे आदी घटनामुळे वीजपुरवठा खंडीत होतो. तुटलेल्या वीज तारांना अनावधानाने मनुष्य वा प्राण्यांचा स्पर्श होऊन धोका होऊ शकते. तेंव्हा अचानकपणे गाव वा परिसराचा वीजपुरवठा खंडीत झाल्यास नागरिकांनी महत्वाच्या कारणाशिवाय तात्काळपणे संबंधित उपकेंद्रास संपर्क करणे टाळावे. या वेळेत उपकेंद्रचालक संबंधित लाईनमनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत असतो. दुरूस्तीच्या कामासाठी विद्युत पुरवठा चालू वा बंद करण्यासंदर्भात सुचनांचे आदानप्रदान सुरू असते. किंवा घटनास्थळावरून एखादी व्यक्ति उपकेंद्रचालकास घटना वा धोक्याबाबत सुचना देण्याचा प्रयत्न करीत असते. MSEDCL appeals to citizens

वीजस्पर्श अपघाताची प्रमुख कारणे- घरात पाण्याचे विद्युत मोटारीला स्पर्श, कपडे वाळत घालण्यासाठी वीजखांबास वा विद्युत प्रवाहित होईल अशा ठिकाणी बांधलेली विद्युत संवाहक तार ( कापडी वा विद्युत रोधक दोरी वापरावी), घरातील लोखंडी खिडकी, दरवाजा, ग्रिल(जाळी), फ्रिज, कुलर,मिक्सर इस्त्री, गिझर आदी विद्युत उपकरणे, ठिकठिकाणी जोडण्यात आलेली वायर मध्ये विद्युत प्रवाह उतरून स्पर्श झाल्याने, विद्युत खांब वा स्टे वायरला स्पर्श, शेतात ओल्या हाताने मोटार चालु करताना, तुटलेल्या वीजतारेच्या स्पर्शाने, मोटारीसाठी वापरलेल्या आवरणरहीत वायरचा स्पर्श, वाहनाच्या टपावर वा मालवाहू ट्रक वा ट्रॅक्टरवर बसल्याने विद्युततारांना स्पर्श, ही अपघाताची प्रमुख व वारंवार दिसून येणारी कारणे आहेत. तरी नागरिकांनी याबाबत काळजी घ्यावी. MSEDCL appeals to citizens

वीजेमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी खालीलबाबींची दक्षता घ्यावी

उपकरणांचा पाण्याशी संपर्क टाळा

पाणी हे वीज सुवाहक आहे. आपल्या घरातील स्विच बोर्ड वीजेची उपकरणे पावसाच्या पाण्याशी किंवा ओलाव्यासी संपर्कात येणार नाहीत, याची विशेष काळजी घ्यावी. वीज मिटरच्या जागी पाणी झिरपुन जागा ओली होत असल्यास, मिटर जवळचा मेनस्विच बंद करुन महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. ओल्याव्याच्या ठिकाणी उपकरणे हाताळतांना पायात रबरी चप्पल किंवा बुट घालावा. घरातील ओले कपडे वीजेची वायर व तारेवर वाळवण्यासाठी टाकू नये. एखाद्यास वीजेचा धक्का बसल्यास त्यास कोरड्या लाकडाने त्या व्यक्तीस स्पर्श न करता बाजुला करावे, त्वरित कृत्रीम श्वासोंश्वास देत रूग्णालयात नेण्यात यावे. MSEDCL appeals to citizens

आर्थिंग व घरातील वीज मांडणी तपासणी व दुरूस्ती

शेतातील व घरातील विद्युत उपकरणांच्या सुरक्षिततेच्या दुष्टीकोनातुन आर्थिंग फार महत्वाची आहे. घरातील विद्युत उपकरणे, विद्युत संच मांडणी व जोडणी, आर्थिंग, वायरींग सुस्थितीत असल्याची खात्री परवानाधारक व्यक्तिकडून करून घ्यावी. आर्थिंग व वायरींगमध्ये दोष आढळल्यास तात्काळ तो दोष परवानाधारक व्यक्तिकडून दुरूस्त केला पाहिजे. घरात सर्वप्रथम स्विच बोर्डा अगोदर अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर (ELCB) बसवणे फार गरजेचे आहे. अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर (ELCB)मुळे घरातील वायरींगमध्ये दोष निर्माण झाल्यास घरातील वीजपुरवठा लगेच बंद होतो, संभाव्य वित्त व जीवित हानी (अपघात) टाळता येण्यास मदत होते. घरातील प्रत्येक स्वीच बोर्डापर्यंत अर्थ वायर पोहचवून जोडणी करावी. इमारतीमध्ये वेगवेगळ्या विद्युत भाराकरीता क्षमतेप्रमाणे मिनीच्युर सर्कीट ब्रेकर (MCB) व मेन स्विचचा वापर करावा. त्यामुळे बाधित भागाचा वीजपुरवठा त्वरीत बंद होऊन सुरक्षित राहण्यास मदत होते. तसेच इतर भागातील वीजपुरवठा सुरु असतो. घरातील जुन्या वायरिंगची तपासणी करणे, खराब झालेली तसेच आवरणाची रोधक क्षमता कमी झालेली वायरींग तात्काळ बदलण्यात यावी. आर्थिंग वेळोवेळी तपासून घ्यावी. MSEDCL appeals to citizens

दर्जेदार उपकरणांचा वापर

फ्रिज, कुलर, मिक्सर, इस्त्री, गिझर, मोटार इत्यादी उपकरणांकरीता थ्री फेज पीन आणि सॉकेटचाच वापर करावा. आय.एस.आय.चिन्ह आणि योग्य दर्जा असलेली विद्युत उपकरणे वापरणे आवश्यक आहे.

बांधकाम करताना काळजी घ्या

लघुदाब, उच्चदाब किंवा अति उच्चदाब वाहीनी खाली कोणत्याही इमारतीचे किंवा इतर बांधकाम करु नये. तसेच इमारत बांधकाम व वाहिन्यांमध्ये नियमानुसार पुरेपुर आडवे अंतर असायला पाहिजे.

शेतात वीजवापर काळजी घ्या

जनावरे, गुरे ढोरे वीजेच्या खांबास, ताणास तसेच वीजेच्या खांबाजवळ वा तारेखाली असलेल्या झाडाला बांधू नये. शेतीपंपाला वीजपुरवठा करणारी व आर्थिंगची वायर अखंड असावी. पाऊस चालू असतांना वीजेचा पंप चालू अथवा बंद करणे शक्यतो टाळावे. पाऊस चालु असताना खांबाजवळ वा वीजतारांखाली थांबणे टाळावे. MSEDCL appeals to citizens

आपतकालीन स्थितीत शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी महावितरणचे मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे 1912 किंवा 1800-102-3435 किंवा 1800-233-3435 हे टोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध आहेत. यासह मोबाईल अॅपवर वीजग्राहक तक्रार दाखल करू शकतात. महावितरणकडे नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरून महावितरणच्या 022-41078500 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास वीजपुरवठा खंडितची तक्रार नोंदविली जाईल. MSEDCL appeals to citizens

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMSEDCL appeals to citizensNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.